Breaking News
Home / न्यूज़ / हा अभिनेता निघाला बाइक चोर आणि नकली नोट बनवणारा

हा अभिनेता निघाला बाइक चोर आणि नकली नोट बनवणारा

चित्रपटा मधील कलाकार आपल्या कलेच्या आधारावर पैसे कमावण्यासाठी ओळखले जातात. अनेक कलाकार आपल्या सिनेमातील भूमिकेसाठी कठोर मेहनत घेतात त्यामुळे ते अनेक लोकांचे आदर्श असतात. पण काही कलाकार यास अपवाद ठरतात ते चुकीच्या गोष्टी करतात ज्याचा समाजावर वाईट परिणाम होतो.

असाच प्रकार एका भोजपुरी सिनेमाच्या अभिनेत्या सोबत झाला आहे. दक्षिण पूर्व दिल्ली मधील AATS च्या टीमने या अभिनेत्याला अटक केली. हा भोजपुरी अभिनेता नकली नोटांचे रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड निघाला.

दिल्ली पोलिसांनी या अभिनेत्याकडून 50 लाख रुपयांच्या नकली नोटा सोबतच दोन चोरीच्या बाईक देखील हस्तगत करून जप्त केल्या आहेत.

आरो’पी शाहिद उर्फ राज सिंह उर्फ ललन आणि सैयद जैन हुसैन यांना अटक केली. शाहिद हा भोजपुरी सिनेमा ‘इलाहाबाद से इस्लामाबाद’ मध्ये दिसला होता.

प्राप्त माहिती अनुसार AATS चे ऑफिसर कैलाश बिष्ट यांनी आंतरराज्यीय ऑटो फिल्टर टोळीचा भांडाफोड केला आहे. या गँगचे मास्टर माईंड अभिनेता शाहिद आणि सैयद जैन हुसैन आहेत. आरोपी शाहिद याने भोजपुरी सिनेमा आणि भोजपुरी गाण्यांमध्ये काम केलेलं आहे.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.