Breaking News

लग्न मंडपा मध्ये नवरी नवरदेवाला बोलली 2 चा पाढा बोलून दाखवा आणि त्यानंतर झाले ते अपेक्षित नव्हते

आज पर्यंत तुम्ही अनेक लोकांच्या लग्नाला हजेरी लावली असेल परंतु आज जी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी घटना घडल्याचे तुम्ही आज पर्यंत कधी पाहिले किंवा ऐकलं नसेल.

शनिवारचा दिवस होता नवरदेव वरती सोबत लग्न मंडपात पोहचला. पण नवरीला नवरदेवाच्या शैक्षणिक पात्रते बद्दल शंका होती. त्यामुळे नवरी ने जयमाला घालण्याच्या अगोदर नवरदेवाला एक प्रश्न केला.

नवरी ने नवरदेवाला 2 चा पाढा बोलायला सांगितला आणि त्यानंतर जे काही झालं ते मुळीच अपेक्षित नव्हतं. कारण हा नवरदेव चक्क दोनचा पाढा बोलण्यात अपयशी झाला ज्यानंतर लग्न थांबवण्यात आलं.

पनवारी स्टेशन हाऊस अधिकारी विनोद कुमार यांच्या म्हणण्या अनुसार हे एक अरेंज मैरीज होते आणि नवरा मुलगा महोबा जिल्ह्यातील धवार गावाचा राहणारा होता.

दोन्ही कुटुंबाचे सदस्य आणि गावातील लोक विवाह स्थळी उपस्थित होते. नवरी ने मंडपातून बाहेर निघताना सांगितलं ती अश्या व्यक्ती सोबत लग्न करू शकत नाही ज्याला गणितातील मूलभूत गोष्टी माहीत नाहीत.

लग्नात उपस्थित मित्रपरिवार आणि नातेवाईक यांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला. नवरीच्या चुलत भावाने सांगितलं कि नवरदेव अशिक्षित आहे हे समजल्यावर धक्का बसला.

नवरदेवाच्या कुटुंबीयांनी आम्हाला तो अशिक्षित असल्याची माहिती दिली नाही. तो कधी शाळेत देखील गेलेला नसावा. नवरदेवाच्या कुटुंबाने आम्हाला धो’का दिला.

गावातील प्रमुख लोकांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षातील लोकांना समजावले ज्यानंतर समझौता केल्याने पोलिसात केस दाखस केली नाही. समझौता हा झाला कि दोन्ही पक्षातील लोक त्यांना मिळालेले उपहार आणि आभूषण ज्याचे त्याला परत देतील.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.