Breaking News
Home / न्यूज़ / 10 महिन्याच्या बाळाच्या तोंडात खड्डा पडला आई त्याला हॉस्पिटल मध्ये तपासायला घेऊन गेल्यावर सर्वाचे हसून हसून पोट दुखल

10 महिन्याच्या बाळाच्या तोंडात खड्डा पडला आई त्याला हॉस्पिटल मध्ये तपासायला घेऊन गेल्यावर सर्वाचे हसून हसून पोट दुखल

एक महिला आपल्या 10 महिन्याच्या बाळाच्या तोंडा मध्ये वरच्या बाजूला खड्डा पडल्याचे पाहून अतिशय घाबरली होतील. महिला बाळाच्या तोंडात अचानक खड्डा निर्माण झाल्याचे निदान करण्यासाठी थेट बाळाला डॉक्टरांच्या कडे घेऊन गेली.

जेव्हा डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली तेव्हा डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले होते. हि घटना इंग्लंड मधल्या एसेक्स शहरातली आहे.

एक दिवस बेकी स्टील्स हि 24 वर्षीय महिला आपल्या हार्वे नावाच्या 10 महिन्याच्या बाळाचे डायपर बदलत होती. डायपर बदलत असताना तिची नजर बाळाच्या तोंडाकडे गेली आणि तिला धक्काच बसला बाळाच्या तोंडात वरच्या बाजूला खड्डा पडल्याचे तिला दिसले.

तोंडात अचानक खोलवर खड्डा पडल्याचे पाहून बाळाची आई भयभीत झाली. तिने बाळाच्या तोंडा मध्ये आपले बोट घालून खड्ड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण बाळ तिला तोंडात हात घालू देत नव्हते आणि जोरजोऱ्यात रडत होते.

हा सर्व प्रकार बाळाच्या आईने बाळाच्या वडिलांना सांगितला. त्यांनी बॅटरीने बाळाच्या तोंडात पडलेला खड्डा पाहिला तरी देखील त्यांना नेमके काय घडलं आहे आणि कसे काय घडलं आहे याचा अंदाज येत नव्हता. यामुळे आई-वडील दोघेही चांगलेच घाबरले.

सहाजिकच आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या बाळाची काळजी वाटतेच त्यातही हे बाळ फक्त 10 महिन्याचे होते त्यामुळे त्यांना काळजी जरा जास्तच वाटत होती कारण बाळ देखील या बद्दल काही माहिती देऊ शकणार नव्हता.

त्यामुळे बाळाच्या आई वडिलांनी हा कोणता आजार आहे किंवा खड्डा कसा पडला हे जाणून घेण्यासाठी बाळाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जे घडले त्या बद्दल बाळाच्या आईने सांगितलं.

हॉस्पिटल मध्ये एका नर्स ने बाळाची जवळपास अर्धा तास तपासणी केली. त्यानंतर तिने सांगितलं कि बाळाच्या तोंडात खड्डा नाही तर खड्ड्याचे चित्र असलेले स्टिकर आहे.

असे सांगून नर्स ने बाळाच्या तोंडा मध्ये आपला बोट घालून हळुवारपणे स्टिकर बाहेर काढले. जे पाहून हॉस्पिटल मध्ये सर्वाना आपले हासणे आवरले नाही. परंतु बाळाच्या आईला मात्र आपली झालेली चूक लक्षात आली.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.