कतरीना कैफ जाहीरपणे सांगितलं कि, सलमान खान हा तर माझा…!

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे यादोघांच्या नात्या बद्दल नेहमीच लोकांच्या मना मध्ये उत्सुकता असते. सलमान खान आणि कतरीना यांच्या मध्ये बॉन्डिंग देखील चांगलं आहे आणि सलमान नेहमी कतरीना कैफला सपोर्ट करण्यासाठी पुढे असतो.

कतरिना ने हल्लीच आपल्या आणि सलमान मधील रिलेशन बद्दल मौन सोडलं आहे. कतरिना ने इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखती मध्ये आपल्या आणि सलमान मधील नात्या बद्दल सांगितलं कि, ‘ माझ्या आणि सलमान मध्ये चांगली मैत्री आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. मी आणि सलमान मागील 16 वर्षा पासून मित्र आहोत.’

कतरिना ने आपल्या इंटरव्यू मध्ये पुढे सांगितले कि, ‘तो एक चांगला व्यक्ती आहे आणि त्याच सोबत माझा मित्र देखील आहे. तो नेहमी मला सपोर्ट करतो. कधीही गरज पडली तर तो नेहमी माझ्या सोबत असतो. भलेही तो नेहमी माझ्या संपर्कात नसेल पण जेव्हाही मी त्याची मदत मागितली तेव्हा तो नेहमीच माझ्या मदतीला पुढे आला आहे.’

हल्लीच झालेल्या आईफा अवार्ड मध्ये सलमान आणि कतरीना यांचा एक व्हिडीओ वायरल झाला होता. या व्हिडीओ मध्ये कतरीनाच्या परफॉर्मन्ससाठी अनाउन्समेंट झाल्या नंतर सलमान खान खुर्ची वरून उठून टाळ्या वाजवून आणि जोऱ्यात ओरडत कतरिनाला चीयर करताना दिसला होता.

कतरीना आणि सलमान यांची जोडी भारत या फिल्म मध्ये लास्ट दिसली होती. या फिल्म ने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली. आता सलमान आणि कतरीना आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. सलमान ‘दबंग 3’ ची शूटिंग करत आहे. तर कतरिना कैफ फिल्म ‘सूर्यवंशी’ मध्ये दिसून येईल. या फिल्म मध्ये कतरिना सोबत लीड रोल मध्ये अक्षय कुमार आहे.

आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे पुन्हा सलमान आणि कतरिना केव्हा फिल्म मध्ये एकत्र दिसून येतात. कारण त्यांची केमेस्ट्री फिल्म मध्ये पाहण्यास प्रेक्षक नेहमीच आतुर असतात.