money

फक्त चार दिवस शिल्लक आहेत तुमच्या जवळ, पूर्ण करा ही महत्वाची कामे

फक्त चार दिवसात आर्थिकवर्ष 2018-19 संपणार आहे. 1 एप्रिल पासून नवीन वित्त वर्ष सुरु होण्यासोबतच अनेक मोठे बदल होतात. या बदलांचा सरळ परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर पडतो. आम्ही तुम्हाला सांगत आहोत अश्याच दहा नियामांबद्दल जे 1 एप्रिल पासून बदलणार आहेत. आपल्याकडे यापैकी काही कामे पूर्ण करण्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत, 31 मार्च ला रविवार असल्यामुळे यापैकी अनेक कामे तुम्ही करू शकणार नाहीत. त्यामुळे आपल्याकडे 30 मार्च पर्यंतच ही कामे पूर्ण करण्याचा वेळ आहे. तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही महाग.

पूर्ण करावीत ही कामे

रद्द होऊ शकतो पैनकार्ड

पैनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. जर आपण यास 31 मार्च पर्यंत लिंक केले नाही तर ते 1 एप्रिल पासून रद्द होईल. हा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. असे न केल्यास आपण पुढील वित्तीय वर्षात आयटीआर फाईल नाही करू शकाल.बैंकेत देखील कामामध्ये अडचणी येऊ शकतात.

Watching tv and using remote control

बंद होईल आपले केबल टीव्ही आणि डीटीएच कनेक्शन

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) च्या नियमा नुसार टीव्ही चैनल पैकेज निवडण्यासाठी आपल्याकडॆ फक्त 31 मार्च पर्यंत वेळ आहे. जर यातारखे पर्यंत आपण आपल्या केबल किंवा डीटीएच ऑपरेटर कडे निवडलेल्या चैनल बद्दल माहिती दिली नाही तर ते बंद होतील.

आइटीआर फाईल करण्याची अंतिम तारीख

31 मार्च पर्यंत वित्तीय वर्ष 2017-18 साठी आयकर रिटर्न फाईल करावे लागेल. यासाठी आपल्याला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. परंतु लहान करदात्यांना ·पाच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) एक हजार रुपये दंड होईल. याच सोबत 2017-18 रिटर्न मध्ये कोणत्याही प्रकारची चूक केली असेल तर, त्यामध्ये सुधारणेची अंतिम तारीख 31 मार्च आहे.

जीएसटी रिटर्न

व्यापारी लोकांसाठी वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. ज्या व्यापाऱ्यांनी अजून पर्यंत रिटर्न भरलेला नाही त्यांच्यासाठी ही शेवटची तारीख आहे. या अंतर्गत व्यापाऱ्यांना विक्री, खरेदी आणि इनपुट टैक्स क्रेडिट ची पूर्ण माहिती द्यावी लागेल.

वाढणार महागाई

1 एप्रिल पासून वाहनात वापरला जाणारा CNG आणि PNG गैस महाग होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक गैसच्या किमतीमध्ये 18 टक्के वाढीची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत कमी होण्याची शक्यता दिसून येत नाही आहे. त्यामुळे देशातील सगळ्या तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोल किमती वाढवू शकतात.

महाग होतील कार बाइक

1 एप्रिल पासून कार खरेदी करणे महाग होईल. टाटा मोटर्स, जगूआर लैंड रोवर इंडिया आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स ने कारच्या किमती मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. अनेक कार आणि बाईक बनवणाऱ्या कंपन्यांनी त्याची घोषणा अगोदरच केलेली आहे. गाड्या जवळपास 25 हजार रुपये महाग होण्याची शक्यता आहे.

स्वस्त होणार घर खरेदी

1 एप्रिल 2019 पासून घर खरेदी करणे स्वस्त होईल. जीएसटी परिषद ने 24 फेब्रुवारी आणि 19 मार्च मध्ये झालेल्या मागील बैठकी मध्ये निर्माणाधीन घरांच्या जीएसटी दरा मध्ये घट करून एक टक्का केली तर इतर श्रेणी तील घरांच्या दरात घट करून पाच टक्के केली आहे.

स्वस्त होईल जीवन विमा

जीवन विमा खरेदी करणे स्वस्त होईल या नवीन बदलाचा सगळ्यात जास्त फायदा 22 ते 50 वर्षाच्या लोकांना होईल. 1 एप्रिल पासून कंपन्या मृत्युदराच्या नवीन आकड्यांचे पालन करेल. आता विमा कंपन्या 2006-08 च्या डाटाचे पालन करत होती. जे आता बदलून 2012-14 होईल.

स्वस्त होईल लोन घेणे

एप्रिल पासून सगळ्या प्रकारचे लोन घेणे स्वस्त होईल. असे यामुळे कारण बैंक आता एमसीएलआर च्या ऐवजी आरबीआय द्वारे दिलेल्या रेपो रेट च्या आधारे लोन देईल. त्यामुळे सगळ्या प्रकारचे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. बैंक आपल्या कर्जाचे गणित वेगवेगळ्या बेंचमार्क नुसार करते.

आपल्याआप ट्रान्सफर होईल EPFO

एप्रिल पासून कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) मोठा बदल करू शकते. नवीन नियमा अनुसार आता नोकरी बदलल्यास आपला पीएफ आपल्याआप ट्रान्सफर होईल. म्हणजेच आता नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी बदलल्यास आपला पीएफ अमाऊंट ट्रान्स्फर करण्याची विनंती देण्याची गरज राहणार नाही. आता पर्यंत युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) असून देखील PF अमाऊंट ट्रान्स्फर करण्यासाठी विनंती करावी लागते.

बदलले जातील आयकर नियम

1 एप्रिल पासून आयकर चे नवीन नियम लागू होतील. ज्याची यावेळी अंतरिम बजेट मध्ये घोषणा केली गेली होती. ज्यामध्ये पाच लाख रुपये उत्पन्नावर टैक्स नाही, स्टैण्डर्ड डिडक्शन 50 हजार रुपये, बैंकेत जमा 40 हजार पर्यंतच्या व्याजावर टैक्स फ्री, भाड्यावर टीडीएस ची सीमा 2.40 लाख रुपये इत्यादी शामिल आहे.

गाडयांना लागतील हाई सिक्युरिटी नंबर प्लेट

वाहन उत्पादकांसाठी एप्रिल 2019 पासून हाई सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) देणे बंधनकारक राहील. या नंबर प्लेट शिवाय गाडी शोरूमच्या बाहेर नाही निघणार. यास मिळवण्यासाठी परिवहन विभागात लाईन लावून वाट पाहण्याची गरज नाही राहणार.

रेल्वे देणार संयुक्त पीएनआर

वर्तमानकाळात जर यात्रेकरूस दोन ट्रेन ने प्रवास करायचा आहे तर त्याच्या नावावर दोन PNR जनरेट होतो. 1 एप्रिल पासून रेल्वे दोन ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यासाठी संयुक्त पीएनआर जनरेट करणार आहे. त्यामुळे जर प्रवासी एक ट्रेन लेट असल्यामुळे दुसरी ट्रेन चुकला तर त्यास कोणतेही पैसे न देता प्रवास रद्द करता येऊ शकेल. यामुळे प्रवाश्याला रिफंड मिळणे सोप्पे जाईल.

मोबाईल प्रमाणे करता येणार विजेचा रिचार्ज

1 एप्रिल पासून आपण मोबाईल प्रमाणे विजेचा रिचार्ज करू शकाल. आता ग्राहक 30 दिवसाच्या बिलाच्या ऐवजी फक्त तेवढेच पैसे भरू शकतो जेवढ्या विजेची त्याला गरज आहे. खरंतर विजेच्या वाढत्या बिलाच्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close