घरा मध्ये चुकूनही लावू नका हे 3 झाड (रोपटे), होते अशुभ आर्थिक तंगीचे होते कारण

अनेक लोक आपल्या घरामध्ये झाड (रोपटे) लावतात ही एक चांगली गोष्ट आहे. झाड निसर्गासाठी किंबहुना आपल्यासाठी चांगलीच आहेत. घरा मध्ये रोपटे लावणे चुकीचे नाही आहे. पण रोपट्याची निवड करताना जर चूक झाली तर त्याचा वाईट प्रभाव आपल्यावर पडू शकतो. थोडक्यात काय तर काही रोपटे आणि झाड असे आहेत ज्यांना चुकूनही आपल्या घराच्या आत किंवा घराच्या बगीच्या मध्ये लावू नयेत. अन्यथा हे रोपटे आपल्या दुर्भाग्याचे कारण होऊ शकतात.

आज आम्ही आपल्याला असे तीन झाडांबद्दल सांगणार आहोत ज्यांना घराच्या अंगणामध्ये लावल्याने आर्थिक तंगी येते. चला तर जाणून घेऊ हे तीन रोपटे कोणते आहेत.

खजूरचे झाड: हे झाड काही राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे पण बहुतेक लोकांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. खजूरचे झाड लावल्यामुळे घरामध्ये पैश्याची कमी होऊ लागते. व्यक्तीने कितीही मेहनत केली आणि पैसे कमावले तरी पैश्याची कमी घरामध्ये सतावते. त्यामुळे आपल्या घरामध्ये खजूरचे झाड लावू नये.

बांबू: बांबू चे झाड घरामध्ये लावल्यामुळे धनाची हानी होते आणि हे झाड घरगुती वादविवादाचे कारण बनते. यामुळे व्यक्ती कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि कधीही कर्ज परतफेड करू शकत नाही. त्यामुळे घरात बांबूचे झाड न लावणेच योग्य राहील.

बोराचे झाड: जर आपण आपल्या घरी हे झाड लावलेलं असेल तर जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर यास उपटून फेकून  द्या.कारण घरा मध्ये बोराचे झाड असल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. आपल्या घराचा विकास होत नाही आणि पैसे घरामध्ये टिकत नाहीत. त्यामुळे बोराचे झाड घरात लावले नाही पाहिजे.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी लावा हे झाड

आपल्याला तर हे समजलं कि घरामध्ये कोणते झाड लावले नाही पाहिजेत जे अशुभ असतात. पण आपल्याला हे देखील माहीत हवे कि कोणते झाड आहेत जे आपल्याला सुखप्राप्ती करून देतात.

तुळशीचे रोपटे: हिंदू धर्मा मध्ये तुळशीला जास्त महत्व दिलेले आहे. तुळशी ही जवळपास सगळ्या हिंदू धर्मीय लोकांच्या घरामध्ये असतेच. घरामध्ये तुळशी लावल्यामुळे भरपूर लाभ होतात. यास लावल्यामुळे आपल्या घरातील धनाच्या संबंधित समस्या दूर होतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये तुळशी आवश्य लावली पाहिजे.

शमीचे झाड: या झाडावर अत्यंत सुंदर फुले येतात आणि हे झाड घराच्या सजावटीसाठी देखील उत्तम आहे. हे झाड आपल्याला घरामध्ये पैश्याची कमी कधीही होऊ देत नाही आणि घरा मध्ये सुख-शांती ठेवण्यास मदत करते.