People

नेहरूंच्या या एका चुकीमुळे आज चीन मध्ये आहे कैलाश

कैलाश मान सरोवर, ज्यास भगवान शंकराचे निवास स्थान मानले जाते. हिंदू लोकांचे हे प्रसिध्द तीर्थस्थळ आता चीनचा कब्जा असलेल्या तिबेट मध्ये येते पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की यामागे पं. जवाहरलाल नेहरू यांची चूक आहे.

इतिहास पाहिल्यास समजते की नेहरूंच्या धोरणामुळे असे झाले आहे आज कैलाश चीन मध्ये आहे आणि तेथे दर्शन करण्यासाठी जायचे असेल तर चीनचा विजा आवश्यक आहे.

भारताच्या स्वातंत्र्या नंतर यागोष्टीला सुरुवात झाली की कैलाश मानसरोवर भारताचा हिस्सा आहे त्यामुळे तो भारताला मिळाला पाहिजे पण नेहरूंच्या धोरणामुळे असे होऊ शकले नाही.

स्वातंत्र्या नंतर इतिहास आणि अनेक ऐतिहासिक कागद पात्रांवर नजर फिरवल्यास समजते कि नेहरूंनी फक्त कैलाश नाही तर ऐतिहासिक रूपाने भारताचा हिस्सा असलेला एक मोठा भूभाग चीनला दिला.

ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा चीनची सेना अत्यंत कमजोर होती आणि चीनच्या तुलनेत भारताची सेना जास्त मजबूत होती त्यामुळे जर नेहरूंनी ठरवले असते तर अगदी सहज कैलाश मानसरोवर भारतात शामिल करू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही.

कैलाश मान सरोवरचा इतिहास तुम्ही बारकाईने पाहीलातर समजेल की हा प्राचीन भारताचा भाग होता. खरतर प्राचीन भारतामध्ये तिबेट नावाची कोणतीही जागाच नव्हती आणि कैलाश मान सरोवरचा पूर्ण भाग भारतीय राजांच्या अधिपत्याखाली होता. जेव्हा भारतामध्ये मुगल आणि इंग्रज राज्य करत होते तेव्हा त्यांनी या डोंगराळ भागाकडे जास्त रुची दाखवली नाही आणि नंतर भारत स्वातंत्र्य झाल्यावर चीनने तिबेटवर हल्ला केला आणि आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी जर भारतीय सेनेने ठरवले असते तर चीनच्या सेनेला सहज धाराशायी करता आले असते पण त्यांनी असे नाही केले त्याचे कारण नेहरू होते. त्यांनी चीनला आपला मित्र मानले आणि कोणतीही कडक कारवाई केली नाही.

नेहरूंनी फक्त दलाई लामा आणि त्यांच्या समर्थकांना चीनच्या सेने पासून वाचवण्यासाठी आपल्या देशात जागा दिली पण कैलाश मान सरोवर परत मिळवण्यासाठी कोणताही रस दाखवला नाही.

असे बोलले जाते कि संसदेत देखील यावर अनेक वेळा चर्चा झाली पण नेहरू प्रत्येक वेळी यावर निरुत्तरित राहिले. संसदे मध्ये अनेक लोकांचे मत होते की भारताने कैलाश मान सरोवर चीनच्या ताब्यातून सोडवण्यासाठी हालचाल केली पाहिजे पण असे काहीही झाले नाही. काही जाणकार मानतात की जर सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले नसते तर कैलाश सोडवण्यासाठी त्यांनी नक्की महत्वपूर्ण भूमिका बजावली असती आणि कदाचित कैलाश मान सरोवर भारताचा भूभाग असता.

इतिहास पाहिल्यास हीच माहिती मिळते. यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकतात. ही पोस्ट फक्त काही महत्वाची माहिती एकत्र करून लिहिलेली आहे.


Show More

Related Articles

Back to top button