नवरात्री मध्ये या पैकी कोणताही 1 संकेत मिळाला तर समजावे देवी आपल्या पूजेवर प्रसन्न आहे

0
19

नवरात्री मध्ये आपण दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करतो. सगळे देवी भक्त आपल्या घरा मध्ये घटस्थापना करतात. असे मानले जाते कि नवरात्रीचा काळ हा मातेला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम असतो. या दिवसांमध्ये मातेची आराधना केल्याने माता लवकर प्रसन्न होते. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण मातेची पूजा करतो आणि तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो.

पण एवढे करून सुद्धा आपल्याला अंदाज येत नाही ती माता आपल्या द्वारे केलेल्या पूजेमुळे आनंदी झाली आहे किंवा नाही? आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळणार आहे किंवा नाही?

जर तुम्हाला देखील या गोष्टीची उत्सुकता वाटत असेल तर आज आम्ही आपल्याला नवरात्री मध्ये मिळणाऱ्या काही खास संकेतांबद्दल माहिती देणार आहोत. जर आपल्याला या पैकी कोणताही संकेत नवरात्रीच्या दरम्यान मिळाला तर समजावेकी माता आपल्या पूजेवर खुश आहे. चला तर जाणून घेऊ कोणते ते संकेत आहेत ज्यामुळे माता आपल्यावर प्रसन्न आहे हे समजू शकते.

नवरात्री मध्ये मिळतात हे शुभ संकेत

जर आपल्याला नवरात्री दरम्यान स्वप्ना मध्ये घुबड दिसले तर याचा अर्थ असा होतो कि माता आपली मनोकामना लवकरच पूर्ण करणार आहे. आपण जे व्रत केले आहे ते सफल झाले आहे. नवरात्रीचे दिवस हे शुभ समजले जातात. जर आपल्याला या दिवसा मध्ये 16 शृंगार केलेली महिला नजरेस पडली तर असे मानले जाते कि आपल्यावर मातेची कृपा आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला आर्थिक लाभ मिळू शकतो.

जर आपल्याला नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी नारळ, कमळाचे फुल किंवा हंस पहाटेच्या वेळी दिसले तर हे शुभ संकेत मानले जातात कारण जेव्हा देवी मातेची पूजा केली जाते त्यामध्ये नारळ आणि कमळाचे फुल यांना विशेष महत्व आहे आणि हंस हे माता सरस्वतीचे वाहन आहे.

जर आपण घराच्या बाहेर निघत असताना आपल्याला गाय नजरेस आली तर हा शुभ संकेत मानला जातो. नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर गाय दिसली विशेषतः पांढरी गाय नजरेस आली तर आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत असे समजावे. जर नवरात्री मध्ये सकाळच्या वेळी ऊस दिसला तर याने मातेची कृपा प्राप्त होत आहे आणि आपल्या कामात आपल्याला यश मिळणार आहे असे मानले जाते.

नवरात्रीचे दिवस शुभ मानले जातात आणि आपल्या पूजेने माता प्रसन्न झाली असेल तर आपल्याला काहींना काही शुभ संकेत मिळतात असे मानले जाते. जर आपल्याला स्वप्ना मध्ये पांढरा किंवा सोनेरी साप नजरेस पडला तरी देखील हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ देवी माता आपल्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या जीवनातील समस्या लवकरच दूर होणार आहेत.