नवरात्री मध्ये मातेला प्रसन्न करायचे असेल तर या विशेष गोष्टी लक्षात ठेवा, कायम राहील मातेची कृपा

नवरात्री हा असा काळ आहे जेव्हा वातावरण पूर्णतः देवी मातेच्या रंगात रंगून जाते आणि याकाळात काही वेगळीच ऊर्जा असल्याचे जाणवते. नवरात्री सुरु होण्याच्या अगोदरच मंदिरामध्ये सजावटीचे काम सुरु होते आणि लाइट इत्यादी लावले जातात. मातेचे भक्त नवरात्री मध्ये नऊ दिवस उपवास देखील करतात.

यावर्षी नवरात्री 29 सप्टेंबर पासून सुरु होत आहे आणि हे 7 ऑक्टॉबर पर्यंत राहील आणि 8 ऑक्टॉबर रोजी दसरा आहे. नवरात्री मध्ये मातेची कृपा मिळवण्यासाठी अनेक लोक व्रत करतात पण अनेक वेळा असे होते कि आपल्याला आपण केलेल्या व्रताचे पूर्ण फलप्राती होत नाही. यामागे मुख्य कारण हे आहे कि नवरात्रीच्या दिवसा मध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर आपण या नियमांचे पालन नाही केले तर यामुळे आपण केलेली पूजा व्यर्थ जाते. आज आम्ही आपल्याला अश्याच काही नियमांबद्दल सांगत आहोत ज्यांना नवरात्री मध्ये लक्षात ठेवले पाहिजे.

नवरात्री मध्ये मातेला प्रसन्न करण्यासाठी या विशेष गोष्टी लक्षात ठेवा

जर आपण नवरात्री मध्ये मातेची पूजा करणार आहात म्हणजेच घटस्थापना करणार असाल तर सगळ्यात पहिले आपल्याला आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे आणि आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडले पाहिजे. तसेच माते समोर तुपाचा दिवा लावा, जर आपण नवरात्री मध्ये अखंड ज्योत लावणार असाल तर हि ज्योत 9 दिवस जळत राहिली पाहिजे आणि या काळात आपण आपल्या घरास रिकामे सोडू नका.

नवरात्रीच्या काळामध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपले नखे आणि केस कापू नयेत तसेच नवरात्रीच्या काळात शेविंग देखील करू नये.

मान्यतेच्या अनुसार नवरात्रीच्या काळात दिवसा झोपले नाही पाहिजे. जर आपण नवरात्रीचा उपवास करत असाल तर आपण दिवसा झोपू नये.

नवरात्रीच्या काळा मध्ये आपण मांस, मच्छी, कांदे, लसूण यासारख्या आहाराला बंद करावे. जर आपण नवरात्रीच्या दरम्यान मातेची पूजा करत असाल तर आपण रोज नियमितपणे सकाळी सूर्य उदय होण्याच्या अगोदर उठले पाहिजे आणि शांत मनाने स्नान इत्यादी करून नंतर मातेची पूजा करावी. आपण सकाळी फलाहार करण्याच्या अगोदर मातेची पूजा करावी, त्यांनतर आपण वाटल्यास दूध घेऊ शकता, पूर्ण दिवस मनातील मना मध्ये आपण मातेचे ध्यान करावे, संध्याकाळी आपण मातेची पूजा करावी आणि नंतर फलाहार करावा.

नवरात्री मध्ये ही गोष्ट विशेषतः लक्षात ठेवा कि लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्ती हे व्रत करणार नाहीत, अश्या प्रकारच्या लोकांनी खऱ्या भक्तिभावाने मातेचे ध्यान करावे. तेवढ्यातच माता आपल्यावर प्रसन्न होईल. जसेकी आपल्याला माहीत आहेच की माता दयाळू आहेत आणि त्यांना फक्त आपल्या भक्तांकडून श्रद्धेची अपेक्षा आहे.