Navratri 2019: कशी करावी नवरात्री मध्ये घटस्थापना? जाणून घ्या योग्य विधी, शुभ मुहूर्त आणि यासंबंधीचे काही नियम

हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचा सण महत्वाचा मानला जातो. यावर्षी नवरात्र 29 सप्टेंबर पासून सुरु होत आहे. तसे पाहता नवरात्रीचा सण देशा मध्ये सर्वत्र साजरा केला जातो. नवरात्री मध्ये लोक नऊ दिवसाचे व्रत करतात. जेव्हा नवरात्र सुरु होते तेव्हा घटस्थापना केली जाते.

आज या पोस्ट मध्ये नवरात्री मध्ये कलश स्थापना करण्याची योग्य विधी, शुभ मुहूर्त आणि त्यासंबंधित महत्वाचे नियम आपण जाणून घेणार आहोत. ज्यांचे पालन केल्यास माता आपल्याला शुभ आशीर्वाद नक्कीच देतील आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतील.

कलश स्थापनेसाठी आपल्याला काही महत्वाच्या वस्तूंची गरज आहे. कलश स्थापनेसाठी आपल्याला स्वच्छ माती, गंगा जल, सुपारी, आंब्याची पाने, अक्षता, फुले, नारळ, लाल कापड इत्यादी आपल्या परंपरेच्या अनुसार वस्तूंची गरज आहे.

कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त यावर्षी 29 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 6:16 पासून ते 7:40 पर्यंत आहे. त्या व्यतिरिक्त आपण दिवस देखील घटस्थापना करू शकता. दिवस कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 11:48 ते 12:35 पर्यंत आहे.

आपल्या परंपरेच्या अनुसार साहित्य वापरून कलश स्थापना करावी. पूजे मध्ये वापरलेले साहित्य हे स्वच्छ आणि पवित्र असल्याची काळजी घ्यावी. घटस्थापना झाल्या नंतर नवरात्रीच्या नऊ दिवस अखंडित दीप (दिवा) सुरु करावा. नऊ दिवस अखंडित दिवा सुरु राहील याची काळजी घ्यावी.

घटस्थापना शुभ मुहूर्तावर करावी. नवरात्री मध्ये पूजा केल्या नंतर नऊ दिवस दोन्ही वेळी मातेला नैवेद्य द्यावे. आपण वाटल्यास मातेला बत्तासेचा नैवेद्य देखील देऊ शकता. मातेला लाल फुले अतिप्रिय आहे त्यामुळे लाल फुले अर्पित करावीत. नवरात्रीच्या नऊ दिवस आपण सात्विक भोजनाचे सेवन करावे. हे काही नियम आहेत ज्यांचे पालन आपण करावे.

वरील प्रमाणे घटस्थापना करून नियमांचे पालन केल्यास माता आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतील याचा विश्वास बाळगावा. आपल्याला वरील माहिती आवडली असेल आणि महत्वपूर्ण वाटली असेल तर इतरांसोबत शेयर करावी.