Connect with us

टमाटर आणि दुध त्वचेसाठी आहे वरदान, घरीच बनवा प्रभावी उपाय आणि काही दिवसात मिळावा ग्लोइंग स्कीन

Health

टमाटर आणि दुध त्वचेसाठी आहे वरदान, घरीच बनवा प्रभावी उपाय आणि काही दिवसात मिळावा ग्लोइंग स्कीन

प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. आपली स्कीन नैचूरली ग्लो करावी आणि त्वचेवर कोणतेही दाग असू नयेत असे वाटते. परंतु काही कारणामुळे हे स्वप्न भंग होते. आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अनेक ब्युटी प्रोडक्ट्स वापरतो पण त्यांचा अपेक्षित फायदा मिळत नाही. आज आपण येथे असे काही उपाय पाहणार आहोत जे आपले स्वप्न पूर्ण करू शकतात.

या उपायाने मिळावा ग्लोइंग स्कीन

गोरी त्वचा मिळवण्यासाठी एक मोठा टमाटर घेऊन त्याचा रस काढा. यामध्ये अर्धा कप फ्रेश कच्चे दुध मिक्स करावे. आता कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे आणि कोरडे झाल्या नंतर थंड पाण्याने धुवून टाकावे. यामुळे स्कीन फ्रेश आणि स्वच्छ दिसेल. त्याच सोबत जर चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर टमाटर आणि मुलतानी मातीचे मिश्रण बनवून चेहऱ्यावर लावावे आणि 15 मिनिट सुकून द्यावे. सुकल्या नंतर गरम पाण्याने धुवून टाकावे.

स्कीनसाठी दही फायदेशीर असते. याच्या वापरामुळे चेहऱ्याची रंगत वाढते. यास वापरण्यासाठी दही आणि 1 मोठा चमचा ओटस बारीक वाटून घ्यावे. आता हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. 20 मिनिट सुकून द्यावे त्यानंतर धुवून घ्यावे. या उपायाने सन टेन दूर होते आणि त्वचा उजळते.

जर आपल्या डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळ आले असेल तर ते दूर करण्यासाठी सोप्पा उपाय आहे. आपल्या डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाट्याचे स्लाईस डार्क सर्कल्स वर ठेवा. वाटल्यास तुम्ही बटाट्याचा रस देखील डार्क सर्कल्सवर लावू शकता. यास रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा आणि सकाळी उठल्यावर धुवून घ्या. यामुळे डोळे फ्रेश दिसतील. बटाट्या मध्ये नैचूरल ब्लीचिंग एजेंट असतात. जे काळा रंग दूर करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर हे पफी आई प्रॉब्लेम दूर करते.

More in Health

Trending

To Top