astrology

नारळाचा हा चमत्कारिक उपाय, कालसर्प आणि शनी दोष सोबतच आर्थिक संकट दूर करेल

प्रत्येक व्यक्ती आपले आयुष्य आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी कष्ट करत असतो. तो आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आवश्यक तेवढे सगळे प्रयत्न करत असतो. ज्यामुळे कुटुंबियांना कोणताही त्रास किंवा संकटांना सामोरे जावे लागू नये. यासाठी व्यक्ती शारीरिक प्रयत्ना सोबतच धार्मिक प्रयत्न देखील करतो. हिंदू धर्मा मध्ये निसर्गाच्या विविध गुणधर्माला ओळखून त्याच्या महत्वाच्या गोष्टी मध्ये वापर केलेला आहे. असे अनेक फळे, फुले आणि वनस्पती आहेत जे आपल्याला जीवनात येणाऱ्या समस्या पासून सुटका मिळवण्यासाठी मदत करू शकतात. यापैकी एक आहे नारळाचे झाड. तुम्हाला माहित आहेच कि भारतीय संस्कृती मध्ये नारळाचे महत्व मोठे आहे. मंदिरामध्ये नारळ फोडले जाते किंवा अर्पित केले जाते. नारळास श्रीफळ या नावाने देखील आपण ओळखतो.

आज आपण नारळाचे काही चमत्कारिक फायदे पाहणार आहोत ज्याच्या मदतीने आपल्या जीवनातील समस्यांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. आपण या उपायांनी आपल्या जीवनात आनंद मिळवू शकतो. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते.

कर्जा पासून मुक्ती मिळवण्यासाठी

जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली आहात तर यापासून सुटका मिळवण्यासाठी एक एका नारळावर चमेलीचे तेल मिक्स केलेल्या शेंदूरने स्वास्तिक काढावे. लाडू किंवा चने आणि गुळ सोबत हनुमान मंदिरा मध्ये जाऊन त्यांच्या चरणी अर्पित करतांना ऋण मोचन मंगल स्त्रोत्र वाचन करावे. हा उपाय केल्यास तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल.

व्यापारामध्ये लाभ प्राप्त होण्यासाठी

जर आपला व्यापार घाट्या मध्ये असेल आणि अनेक प्रयत्न करून देखील यश मिळत नसेल तर शनिवार किंवा मंगळवारच्या दिवशी एक नारळ सव्वा मीटर पिवळ्या कपड्या मध्ये लपेटून एक जोडी जानवे, सव्वा पाव मिष्ठान सोबत जवळील कोणत्याही राम मंदिरामध्ये अर्पित करावे. हा उपाय केल्याने व्यापारात प्रगती दिसून येईल.

आर्थिक संकटापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय

आपल्या अनेक प्रयत्नानंतर देखील आपल्याला पैसे कमावण्यात अडचणी येत असतील किंवा पैसे येतात परंतु ते टिकत नाहीत. आपण धन संचय करण्याचा प्रयत्न करता परंतु त्यामध्ये यश मिळत नाही. यामधून बाहेर येण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी कोणत्याही दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरा मध्ये एक नारळ, गुलाब, कमल पुष्प, सव्वा मीटर गुलाबी धागा, पांढरे कापड, सव्वा पाव चमेली, दही, पांढरी मिठाई, एक जोडे जानवे माता लक्ष्मीला अर्पित करावे. यानंतर कापूर आणि देसी घी वापरून दिवा लावून आरती करावी आणि कनकधारा स्तोत्र जप करावे. या उपायाने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.

कालसर्प किंवा शनी दोष पासून सुटका मिळवण्यासाठी

जर आपल्या जीवनामध्ये शनी, राहू किंवा केतू मुळे समस्या उत्पन्न होत असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी मंगळवारच्या दिवशी एक नारळ काळ्या कपड्यामध्ये गुंडाळून 100 ग्राम काळे तीळ, 100 ग्राम उडीद डाळ तसेच एक खिळा हे साहित्य वाहत्या पाण्यात सोडावे. या उपायाने आपल्याला फायदा होईल तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे किंवा राहू केतू अशुभ फळ देत असतील तर नारळ आणि काळे पांढरे घोंगडे दान करावे यामुळे कालसर्प दोष आणि राहू केतूच्या दुषप्रभावा पासून सुटका मिळते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button