नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना | Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana : महाराष्ट्र सरकार लवकरच हि योजना सुरु करणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याना लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकार छोटे तसेच मध्यम वर्गातील शेतकऱ्यांची मदत करेल. महाराष्ट्र सरकार द्वारे या योजनेवर 4000 करोड रुपये खर्च केले जातील.

हि योजना विकासाला गती देण्यास मदत करेल. या योजनेच्या अंतर्गत सरकार महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 5,142 गावांमध्ये या योजनेची सुरुवात होईल. महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आरंभ करत आहे. या योजनेच्या मदतीने महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार पाण्याच्या उपलब्धते अनुसार शेतामध्ये पीक कोणते असावे याकडे विशेष लक्ष दिले जाईल. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दुप्पट करण्यासाठी या योजनेची सुरुवात करत आहे. महाराष्ट्र सरकार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी विश्व बैंकेची मदत घेणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

 • या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील छोट्या आणि मध्यम वर्गातील शेतकऱ्यांची मदत करणे आहे.
 • ज्यांचे निसर्ग आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे नुकसान होत आहे.
 • सरकार या योजनेवर 4000 करोड रुपये खर्च करणार आहे.
 • या योजनेसाठी 2800 करोड रुपये कर्ज रूपात जागतिक बैंक देईल.
 • तर 1200 करोड दुसऱ्या राज्यांकडून मदत रूपात घेतली जाईल.
 • कृषी सचिवांच्या नेतृत्वामध्ये 7 सदस्यांची एक समिती या योजनेसाठी दुष्काळग्रस्त गावांची ओळख करेल.
 • 15 जिल्ह्यात 5142 गावात महाराष्ट्र सरकार द्वारे हि कृषी संजीवनी योजना सुरु केली जात आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे फायदे

 • महाराष्ट्र सरकार सहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने या योजनची सुरुवात करत आहे.
 • नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने मध्ये पिकांच्या प्रकारामध्ये विकास केला जाईल.
 • हि योजना दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आहे.
 • दुष्काळग्रस्त प्रदेशाला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने हि योजना फायदेशीर आहे.
 • या योजने मध्ये महाराष्ट्रातील 5142 गावांना लाभ मिळणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा कालावधी

या योजनेचा कालावधी 6 वर्ष आहे. कृषी संजीवनी योजना 2018-19 पासून सुरु होऊन 2023-24 पर्यंत सुरु राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here