Breaking News

आपल्या घरामध्ये वरच्या किंवा खालच्या दिशेने जाणाऱ्या मुंग्या देतात हे खास संकेत…

घरामध्ये दिसणाऱ्या मुंग्या काही मोठ्या घटनांच्या बाबतीत संकेत देतात. असे मानले जाते की मुंग्या घरामध्ये वरच्या दिशेला जात आहेत किंवा खालच्या दिशेला जात आहेत यावरून बरेच काही समजते आणि या व्यतिरिक्त आपल्या घरा मध्ये आलेल्या मुंग्यांना काही खाण्यासाठी मिळत आहे किंवा नाही यावर अनेक घटनांवर केंद्रित होणे मानले जाते. याच सोबत कोणत्या मुंग्या आहेत, लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या हे देखील महत्वाचे असते.

मुंग्या देतात हे खास संकेत

ज्योतिष शास्त्र अनुसार जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या येत असतील तर त्या सुख आणि ऐश्वर्य येण्याचा संकेत देतात. शास्त्रा मध्ये सांगितलं आहे कि काळ्या मुंग्यांना अन्न मिळणे शुभ असते. याच सोबत जर तांदळाच्या भरलेल्या भांड्यातून मुंग्या निघत असतील तर हे शुभ संकेत असतात.

जर आपल्या घरामध्ये कोठेही लाल मुंग्या दिसल्यातर समजावे कि मोठे संकट येणार आहे. धार्मिक मान्यता नुसार भविष्यातील अडचणी, विवाद, धन खर्च होणे हे संकेत लाल मुंग्या देतात.

जर लाल मुंग्या आपल्या घरी येत असतील तर हे अशुभ आहे याच सोबत जर लाल मुंग्या तोंडात अंडे घेऊन घरातून जात असतील तर हे चांगले संकेत आहेत.

काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये उत्तर दिशेने येत असतील तर हे आपल्यासाठी शुभ संकेत मानले जातात. जर दक्षिण दिशेने येत असतील तर ते देखील फायदेशीर होईल पण पूर्व दिशेने मुंग्या येत असतील तर नकारात्मक सूचना आहे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.