Mumbai News : हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प, वांद्रे स्टेशन जवळ लोकलचे व्हील रुळा वरून खाली घसरले

मुंबई: वांद्रे स्टेशन जवळ लोकलचे चाक सुट्टीच्या दिवशी रुळावरून खाली घसरल्यामुळे प्रवासाचे हाल होत आहेत. लोकलचे चाक खाली घसरल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गाची वाहतूक पुढील आदेश मिळेल पर्यंत बंद करण्यात आलेली आहे. चांगली गोष्ट हि आहे आहे या घटने मध्ये कोणतेही मोठे नुकसान झालेलं नाही तसेच कोणत्याही प्रवाश्याला इजा झालेली नाही.

पण या दुर्घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्या नंतर घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी गेले व त्यांनी घटनेची पाहणी केली. प्राथमिक माहिती अनुसार सीएसटी-वांद्रे लोकलच्या पहिल्याच डब्याचे चाक माहीम आणि किंग्स सर्कल स्टेशनच्या मध्ये रुळाच्या खाली घसरले. प्राप्त माहितीच्या अनुसार हि घटना सकाळी 11:30 च्या दरम्यान झाली आहे. यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. आपल्या माहितीसाठी हार्बर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अंधेरी-सीएसटी, अंधेरी-पनवेल लोकलची वाहतूक पुढील आदेश मिळे पर्यंत स्थगित ठेवण्यात आलेल्या आहेत.

सुदैवाने आज गांधी जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने गर्दी कमी होती त्यामुळे मोठा अपघात झालेला नाही आणि कोणत्याही प्रवाशाला इजा पोहचलेली नाही. घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी दाखल झाले आहेत आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केलेले आहेत. प्रवाशांना विनंती आहे कि जर आपण या मार्गाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर पर्यायी मार्गाचा वापर करावा ज्यामुळे आपल्याला होणार त्रास टाळता येऊ शकतो.

सदरची लोकल सीएसटी-वांद्रे होती आणि माहीम आणि किंग्स सर्कल स्टेशनच्या मध्ये रुळाच्या खाली घसरली. या लोकल मध्ये आज गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टाळला असे मानले जात आहे. जर नियमित ऑफिसच्या दिवशी अशी घटना झाली असती तर हा अपघात काही प्रवाशांना त्रासदायक झाला असता. तसेच वाहतुकीवर अधिक जास्त ताण पडला असता.