foodinspirationPeople

नोकरी सुटल्या नंतर देखील या व्यक्तीने जिद्दीने कसे कमवले 4 करोड रुपये तेही एका वर्षात, जाणून घ्या तुम्ही पण

महाराष्ट्रातील लोकांचा आणि विशेषतः मुंबईतील लोकांचा आवडता वडापाव अतिशय चविष्ट, खिशाला परवडणारा आणि कमी पैश्यात झटपट पोट भरणारा अशी याची ख्याती आहे. पण तुम्हाला वडापावची अजून एक ओळख माहीत आहे का? वडापाव विकून झटपट पैसे कमावता येतात तेही फक्त घरखर्च चालवण्या एवढे नाहीत तर करोडो रुपये. कोण कमवत आहे करोडो रुपये वडापाव विकून चला पाहू.

सुजय सोहानी नावाचा एक युवक लंडन मध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फूड अँड ब्रेव्हरेज मॅनेजर या पदावर काम करायचा. पण २००९ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा याला फटका बसला आणि सुजय बेरोजगार झाला. सुजयला आपली नोकरी गमवावी लागली. पण लंडन सारख्या महागड्या शहरामध्ये राहायचे तर शांत राहून चालणार नाही हे त्याला माहीत होते. त्यामुळे नवीन नोकरीचा शोध घेण्या एवजी लंडन मध्येच स्वताचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला.

व्यावासायामध्ये मदत होईल म्हणून या उद्देशाने सुजयने ही कल्पना आपला मित्र सुबोध जोशी याला सांगितली आणि सुबोधने सहमती दाखवली. हे दोन्ही मित्र पूर्वी मुंबई मध्ये एका कॉलेजमध्ये एकत्र शिक्षणास होते. लंडनमध्ये खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी उत्तम जागा कोणती राहील याचा शोध त्यांनी सुरु केला. त्यादरम्यान त्यांना खाद्यपदार्थामध्ये वडापाव विक्री करण्याची कल्पना सुचली.

 

त्यांनी एका आईसक्रिम पार्लरमध्ये जागा भाड्याने घेऊन वडापावच्या व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला ग्राहक जमवण्यासाठी त्यांनी फ्री मध्ये वडापाव वाटले आणि ग्राहकांची मन जिंकली. हळूहळू उत्पन्न वाढल्या नंतर दोघांनी पदार्थांची यादी पण वाढवली. वडापावसोबतच दाबेली, समोसा, भेळ, कचोरी, भजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस यासारख्या पदार्थांची देखील विक्री करायला सुरूवात केली. २०१० साली त्यांनी ‘श्रीकृष्ण वडापाव’ नावाने भारतीय हॉटेल सुरु केले. सात वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांना आता या व्यवसायातून वर्षाकाठी ४ कोटींहून अधिक रुपयांचा फायदा होतो.


Show More

Related Articles

Back to top button