तुमच्या कडे एक पेक्षा जास्त PAN कार्ड असतील तर ही बातमी नक्की वाचा नाही तर पडू शकता संकटा मध्ये

पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजेच PAN हे एक अत्यंत आवश्य आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. बैंकेत अकाउंट उघडण्या पासून ते प्रॉपर्टी खरेदी विक्री करणे, गाडी खरेदी किंवा विक्री करणे, आयटीआर फाइल करणे, 2 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त रुपयांची ज्वेलरी खरेदी करणे यासारख्या कामांसाठी PAN कार्ड बंधनकारक आहे. PAN हा एक युनिक नंबर असतो आणि दोन लोकांचे किंवा दोन कंपनीचे एक समान PAN असू शकत नाही. त्याच सोबत एका व्यक्तीचे किंवा कंपनीचे दोन PAN देखील असू शकत नाहीत.

आयकर नियमांच्या अनुसार कोणाकडेही एका पेक्षा जास्त PAN असतील तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. जर एखाद्या जवळ एक पेक्षा जास्त PAN असतील तर त्यावर इनकम टैक्स एक्ट 1961 च्या सेक्शन 272B च्या प्रावधानानुसार 10 हजार रुपये दंड लागू शकतो. त्यामुळे जर आपल्या जवळ एक पेक्षा जास्त PAN झाले असतील तर कोणत्याही कायदेशीर कारवाई मध्ये फसण्या पेक्षा चांगले आहे कि लवकरात लवकर अतिरिक्त PAN सरेंडर करावे.

PAN सरेंडर कसे करावे?

अतिरिक्त PAN सरेंडर करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अप्लाय करता येते. सरेंडर करण्यासाठी आणि नावात सुधार किंवा एड्रेस चेंज या सारख्या बदलासाठी फॉर्म सामान असते. NSDL च्या वेबसाइट किंवा ऑफिस मध्ये जाऊन “Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data” घ्या. या फॉर्मला भरून जमा करा. या फॉर्म मध्ये जो PAN चालू ठेवायचा आहे त्यास टॉप वर मेंशन करा आणि बाकी उरलेल्या पैन ची माहिती फॉर्म मध्ये आयटम नंबर 11 मध्ये भरा. तसेच ज्या PAN ला कैन्सल करायचे आहे त्याची कॉपी फॉर्म सोबत जोडा.

एका पेक्षा जास्त PAN कधी

काही लोक वेगवेगळ्या उद्देश्यासाठी वेगवेगळे PAN बनवतात. डिमॅट खात्यासाठी वेगळे PAN आणि इनकम टैक्स चे पेमेंट आणि रिटर्न भरण्यासाठी वेगळे. तसेच काही लोक जुना PAN हरवल्यास नवीन PAN साठी अप्लाय करतात. या कारणामुळे देखील त्यांच्याकडे दोन PAN होतात. जर डिमॅट आणि इनकम टैक्ससाठी वेगवेगळे PAN बनवून ठेवले असेल तर एक PAN सरेंडर करावे लागेल. अश्या स्थिती मध्ये ते PAN सरेंडर करा, ज्याचा इनकम टैक्सच्या उद्देश्यासाठी वापर करता. दुसरा PAN सरेंडर करून त्यांना आपल्या मुख्य PAN ची माहिती पाठवा.

PAN हरवल्यास काय करावे?

जर जुने PAN हरवले असेल तर दुसरं PAN नव्याने बनवण्याच्या ऐवजी डुप्लिकेट पैन बनवा. जर तुम्हाला आपला PAN नंबर आठवत नसेल तर इनकम टैक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वर जाऊन “Know Your PAN” च्या माध्यमातून PAN ची माहिती मिळवता येऊ शकते. यामध्ये नाव, वडिलांचे नाव आणि जन्म तारीख प्रोवाइड करून PAN ची माहिती मिळवता येऊ शकते. एकदा PAN ची माहिती मिळाली कि डुप्लिकेट PAN साठी अप्लाय करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here