Beauty Tips in Marathi

मुलतानी माती फायदे आणि उपयोग, चेहरा आणि केस सुंदर चमकदार करण्यासाठी

मुलतानी माती फायदे आणि उपयोग मराठी मध्ये : चेहऱ्यावरचे मुरुमे आणि फोड्यावर उपाय करण्यासाठी, चेहर गोरा करण्यासाठी आणि केस सुंदर बनवण्यासाठी मुलतानी माती चा उपयोग करणे अगदी सोप्पे आणि चांगले आहे. स्कीन ऑयली असो किंवा कोरडी प्रत्येक प्रकारच्या त्वचेवर वापरू शकता. अनेक लोकांचा प्रश्न असतो की मुलतानी माती चा उपयोग केसांसाठी आणि फेस पैक म्हणून कसा करावा आणि यामुळे मिळणारे फायदे नुकसान काय आहेत आणि योग्य पद्धत कोणती. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत multani mitti ke fayde in marathi.

मुलतानी माती कशी तयार होते

नावावरून तुम्ही अंदाज करू शकता की ही एक माती आहे आणि ही माती जी खरी तर माती स्वरूपात नसते तर दगड असतो तो पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील मुलतान मध्ये मिळते. या दगडाला नंतर बारीक पावडरीचे स्वरूप देऊन याचा वापर केला जातो.

मुलतानी माती तुम्हाला कुठे मिळेल

  • मुलतानी माती तुम्हाला तुमच्या शहरातील जडीबुटी ज्या दुकानात मिळते तेथे मिळू शकते.
  • तसेच आजकाल बाजारात मुलतानी मातीचे तयार फेस पैक देखील मिळतात. ज्यावर ते कसे वापरायचे ते लिहिलेले असते.
  • तुमच्या जवळपास पतंजली स्टोर असेल तर तेथे तुम्हाला पतंजली मुलतानी मिट्टी फेस पैक मिळू शकतो.

मुलतानी माती फायदे आणि उपयोग कसा करावे

Multani Mitti ke Fayde in Marathi

मुलतानी माती कशी लावावी

1. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी गुलाब जल, मुलतानी माती आणि मध मिक्स करून यांची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटानंतर स्वच्छ करा.

2. सावळ्या त्वचेसाठी ऑलिव ओईल, मुलतानी माती आणि गाजरचा कीस घ्या आणि पेस्ट बनवून लावा आणि 30 मिनिटांनी धुवून टाका.

3. तेलकट त्वचेवर मुलतानी माती सर्वात जास्त फायदा करते. लिंबूरस, मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर 30 मिनिटांसाठी लावा, नंतर चेहरा स्वच्छ करा.

4. त्वचा चमकदार बनवण्यासाठी पपईचे साल, Vitamin E चे 2 कैप्सूल आणि मुलतानी माती यांचा लेप बनवा. हा लेप 20 मिनिट चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवून टाका.

5. कोरड्या त्वचेसाठी बादाम फेस पैक, दुध आणि मुलतानी माती मिक्स करून वापरा आणि 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. या उपायाने चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि नरम होईल.

6. चेहऱ्यावरचे दाग आणि धब्बे घालवण्यासाठी मुलतानी माती, लिंबू आणि गुलाब जल मिक्स करून फेस पैक बनवा. ज्यालोकाना दाग आणि मुरुमांचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय प्रभावी ठरेल.

7. पुदिन्याची पेस्ट, मुलतानी माती आणि दही एकत्र करून लावल्याने दाग धब्बे दूर होण्यास मदत होते.

8. काकडीचा रस, दही, टमाटरचा गर आणि मुलतानी माती एकत्र करून 20 मिनिटसाठी चेहऱ्यावर लावा. या उपाया मुळे तुमचा face clean होईल आणि glowing skin मिळेल.

9. चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या दूर करण्यासाठी दही, 1 अंडे आणि 1 चमचा मुलतानी माती मिक्स करून याची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.

10. अर्धा चमचा चंदन पावडर, 2 चमचे मुलतानी माती आणि चिमूटभर हळद घ्यावे. जर तुमची त्वचा ऑईली असेल तर यामध्ये लिंबूरस किंवा पाणी मिक्स करा आणि जर कोरडी त्वचा असेल तर यामध्ये दुध मिक्स करून लेप बनवा. चेहऱ्यावर मुरुमांचे दाग दूर करण्यासाठी चंदन फायदेशीर आहे.

मुलतानी माती चे फायदे केसांसाठी – Multani Mitti Benefits For Hairs in Marathi

  • केस कोरडे आणि निर्जीव असतील तर अर्धा कप दही, 3-4 चमचे मुलतानी माती, अर्धा कप दही, अर्धा कप लिंबूरस आणि 2 चमचे मध मिक्स करून केसांना लावा आणि 20 मिनिटानंतर धुवून टाका.
  • ऑयली हेयर्स साठी तुम्ही मुलतानी माती 4 तास पाण्यात भिजत ठेवा यानंतर त्यामध्ये रिठा पावडर मिक्स करा 30 मिनिटानंतर हा लेप केसांवर लावा. केसांवर लावल्यावर 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवून घ्या.
  • मुलतानी मातीचा वापर तुम्ही केस सरळ करण्यासाठी देखील करू शकता. मुलतानी माती 1 कप, तांदळाचे पीठ 5 चमचे आणि 1 अंडे मिक्स करून नंतर केसांना लावा आणि कंगव्याने केस सरळ करा. जेव्हा हे सुकेल तेव्हा केस शैम्पू करा नंतर कंडीशनर करा.
  • केसांना फाटे फुटणे उपाय म्हणून तुम्ही रात्री hair oil लावा नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलतानी माती मध्ये दही मिक्स करून लेप बनवून केसांवर लावा. जेव्हा हे सुकेल तेव्हा थंड पाण्याने धुवा.

 

तुम्हाला मुलतानी माती फायदे आणि उपयोग कसा करावे, Multani Mitti Benefits For Hairs in Marathi हा लेख कसा वाटला आम्हाला सांगा आणि जर तुम्हाला चेहरा आणि केसांना मुलतानी मातीचे फायदे, मुलतानी माती कशी लावावी याबद्दल काही सूचना करायच्या असतील तर त्यांचे स्वागत आहे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button