health

मुलतानी माती मध्ये या 2 वस्तू मिक्स करून लावा, 1 आठवड्यात सावळा रंग उजळेल

जेव्हा आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते तेव्हा यावर दाग दिसतात आणि मोठे पोर्स दिसतात आणि त्वचेची चमक निघून जाते आणि चेहरा सावळा दिसतो. आज या पोस्त मध्ये आम्ही तुम्हाला मुलतानी मातीची एक पेस्ट बनवायला शिकवणार आहोत ज्यामुळे तुमच्या यासर्व समस्या दूर होतील आणि चेहऱ्याची चमक वाढेल, चेहरा गोरा होईल.

तुम्हाला माहित असेलच की मुलतानी माती हा एक असा नैसर्गिक पदार्थ आहे जो त्वचेला आणि केसांना निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी आपली मदत करतो. मुलतानी मातीचा वापर फार पूर्वी पासून सौंदर्य वाढवण्यासाठी केला जात आहे.

चेहरा गोरा करण्यासाठी उपाय, Homemade Beauty Tips in Marathi

मुलतानी माती तुम्हाला बाजारात सहज आणि स्वस्त मिळेल. मुलतानी मातीची पावडर देखील आता बाजारात उपलब्ध आहे.

सावळ्या त्वचेसाठी पेस्ट तयार करण्याची पद्धत

या पेस्टला तयार करण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात मुलतानी माती घ्या आणि त्यामध्ये एक चमचा बेसन आणि एक चमचा चंदन पावडर मिक्स करा. लक्षात ठेवा चंदन पावडर पांढऱ्या रंगाची घ्यावी कारण या उपायांमध्ये मुलतानी माती आणि चंदन पावडर हे साहित्य मुख्य आहे.

मुलतानी माती फायदे आणि उपयोग

आता या मध्ये गुलाब जल मिक्स करून एक स्मूथ पेस्ट तयार करा. आता पाहू या पेस्टला कसे वापरावे. ही पेस्ट लावण्या अगोदर कापूस गुलाब पाण्यात भिजवून त्याने त्वचा स्वच्छ करा. आता या पेस्टला खालून वरच्या बाजूस लावण्यास सुरुवात करा.

उपयोग करण्याची पद्धत आणि फायदे

यामुळे तुमची त्वचा ढिल्ली पडणार नाही आणि टाईट राहील. लक्षात ठेवा हा लेप त्वचेवर लावल्यावर तुम्हाला बोलायचे नाही आहे. 15 ते 20 मिनिट लेप लावून ठेवा त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 3 वेळा करावा.

मुरुमांवर उपाय मुलतानी माती

प्रदूषण आणि त्वचेची योग्य देखभाल न केल्याने चेहऱ्यावर मुरुमे येतात. मुलतानी माती आणि कडुलिंब पेस्ट मुरुमांचे येणे कमी करते.

पेस्ट बनवण्याची पद्धत

एका भांड्यात एक लहान चमचा कडुलिंबाची पावडर किंवा पेस्ट घ्या, यामध्ये दोन लहान चमचे मुलतानी माती, आवश्यकतेनुसार गुलाब पाणी, एक चिमुट कापूर आणि चार-पाच लवंग बारीक करून पावडर बनवून पैक मध्ये टाकून पैक तयार करा. चेहऱ्यावर मुरुमे असलेल्या जागी व्यवस्थित लावून दहा-पंधरा मिनिट लावून ठेवा आणि सुकल्यावर धुवून घ्या.

सुरुकुत्या पडल्यास मुलतानी माती

जेव्हा तुम्ही तरुण वयातून वयस्क होऊ लागता तशी तुमच्या चेहऱ्यावरची त्वचा सैल पडते आणि सुरुकुत्या पडतात. पण मुलतानी मातीचा पैक तुमची ही समस्या लवकरच दूर करण्यास मदत करतो.

पेस्ट बनवण्याची पध्दत

एका भांड्यात मुलतानी माती आणि दही सम प्रमाणात घ्यावे आणि त्यामध्ये एक अंड फोडून टाकावे. हा पैक स्मूथ बनवण्यासाठी व्यवस्थित मिक्स करा. हा पैक चेहऱ्यावर लावून 20 मिनिट सुकून द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. पैक धुतल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या स्वरूपाचा फ्रेशनेस जाणवेल.


Show More

Related Articles

Back to top button