Breaking News

धोनी च्या मुलीला गार्डन मध्ये जख’मी पक्षी दिसला, ती ओरडली ‘पापा-पापा…’ ज्यानंतर धोनी ने वाचवला जीव

महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) सोशल मीडिया वर फारसा एक्टिव नसतो. पण महेंद्र सिंह धोनीची मुलगी जीवा (Ziva Dhoni) आणि त्याची बायको साक्षी धोनी (Sakshi Dhoni) भरपूर प्रमाणात सक्रिय असतात. ते एमएस धोनी (MS Dhoni) चे भरपूर व्हिडीओ आणि फोटो आपल्या सोशल मीडिया वरून शेयर करत असतात.

यावेळी जीवा धोनी (Ziva Dhoni) ने धोनी (MS Dhoni) चा फोटो शेयर केला आहे आणि सांगितले कि तिचे वडील महेंद्र सिंह धोनी (Dhoni) ने एका पक्षाचे प्राण कसे वाचवले. या फोटो मध्ये आपण धोनी (Dhoni) च्या हातात एक जख’मी पक्षी पाहू शकता आणि तो त्यास पाणी पाजत आहे.

MS Dhoni Save Injured Bird At Their Farm House Daughter Ziva Shared Story On Instagram - धोनी च्या मुलीला गार्डन मध्ये जख'मी पक्षी दिसला, ती ओरडली 'पापा-पापा...' ज्यानंतर धोनी ने वाचवला जीव
एमएस धोनी ने चिमण्यांचे प्राण वाचवले, जीवा धोनी ने ओरडून बोलावलं होत वडिलांना

जीवा धोनी (Ziva Dhoni) ने एकूण 4 फोटो पोस्ट केले आणि याबद्दल माहिती दिली आहे. जीवा ने फोटो शेयर करताना लिहलं आहे कि,

‘आज संध्याकाळी मला लॉन मध्ये एक जख’मी पक्षी दिसला. मी आई-वडिलांना आवाज देऊन बोलावलं. पप्पांनी पक्षाला हातात घेतलं आणि त्याला पाणी पाजलं. काही वेळानं जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा आम्हाला आनंद झाला. आम्ही तेथेच त्याचं घर बनवलं. मम्मी ने सांगितलं कि हा क्रिमसन ब्रेस्टिड बारबेट आहे आणि याला कॉपरस्मिथ देखील म्हणतात. हा एक छोटासा सुंदर पक्षी आहे, थोड्यावेळाने तो उडून गेला. पण मला त्याला थांबवायच होत, ज्यावर मम्मी म्हणाली तो आपल्या मम्मी कडे निघून गेला. मला त्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे.’

महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) लॉकडाउन मध्ये आपल्या फार्म हाउस मध्ये आहे आणि कुटुंबा सोबत वेळ घालवत आहे. धोनी कधी आपल्या घराच्या बाहेर गार्डन मध्ये बाइक चालवताना दिसतो तर कधी नुसताच फिरताना दिसतो.

एमएस धोनी (MS Dhoni) ने हल्लीच एक टैक्टर खरेदी केला होता. त्याचा टैक्टर चालवतानाचा व्हिडीओ देखील वायरल झालेला. तर आता चिमण्याला जीवदान देतानाच व्हिडीओ वायरल होत आहे.

कोरोनावायरस (CoronaVirus) मुळे क्रिकेट चाहते आईपीएल (IPL) मिस करत आहेत. अनेकांना आशा होती कि वल्ड कप नंतर महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) पुन्हा एकदा आईपीएल (IPL) मध्ये क्रिकेट खेळताना दिसेल. पण COVID-19 महामारी मुळे ते शक्य झालं नाही. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) सध्या आपल्या घरी आहे आणि जीवा धोनी (Ziva Dhoni),  साक्षी धोनी (Sakshi Dhoni) सोबत वेळ घालवत आहे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.