Breaking News
Home / करमणूक / अहंकार केल्याने आपल्या जीवनात समस्या वाढतात, यास लवकरात लवकर दूर केलं पाहिजे

अहंकार केल्याने आपल्या जीवनात समस्या वाढतात, यास लवकरात लवकर दूर केलं पाहिजे

एक लोककथेच्या नुसार जुन्या काळी एक राजा आपल्या प्रजेच्या सुखाची काळजी घेत होता. तो अत्यंत धार्मिक आणि संस्कारी होता. जेव्हा त्याचा वाढदिवस आला तेव्हा त्याने विचार केला कि आज एका व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. संपूर्ण राज्यातील प्रजा आपल्या राजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजमहालामध्ये आली. प्रजेसोबत एक संत देखील शुभेच्छा देण्यासाठी तेथे उपस्थित होता.राजा साधु-संताचा खूप सन्मान करत होते. संताची भेट घेऊन राजा आनंदी झाला. त्याने संताला विचारले गुरुदेव आज मी प्रण केला आहे कि आज एका व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू इच्छितो. आज तुम्ही जे हवे ते मागू शकता.

संत म्हणाले मी तर सांसारिक जीवनाचा त्याग केला आहे, मी राज्याच्या बाहेर राहतो. दिवसभर परमेश्वराची भक्ती करतो, मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. जर तुम्ही काही देऊ इच्छित असाल तर तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता.यावर राजा विचार करू लागला कि संताला काय दिले पाहिजे, राजा म्हणाला मी तुम्हाला एक गाव देतो. त्यावर संत म्हणाले नाही महाराज, गाव तर तेथे राहणाऱ्या प्रजेचे आहे. तुम्ही तर केवळ गावाचे रक्षक आहेत. राजा म्हणाला हा महाल घ्या. संत म्हणाले हे देखील आपल्या राज्याचे आहे. येथे बसून आपण प्रजेच्या भलाईचे काम करता. हि देखील प्रजेची संपत्ती आहे.

भरपूर विचार केल्या नंतर राजा म्हणाला कि तुम्ही मला आपला सेवक बनवा. मी स्वतःला समर्पित करतो. संत म्हणाले नाही महाराज, तुमच्यावर तर तुमच्या पत्नी आणि मुलांचा अधिकार आहे. मी तुम्हाला माझ्या सेवेत नाही ठेवू शकत.संत सांगत असलेले तर्क ऐकून राजाला आश्चर्य झाले, ज्यावर राजा म्हणाला गुरुदेव तुम्हीच सांगा, मी तुम्हाला काय देऊ शकतो? संत म्हणाले कि राजन आपण आपला अहंकार मला द्या. आज आपल्या अहंकार त्याग करा, हि एक वाईट गोष्ट आहे, यास व्यक्ती सहज सोडू शकतो. अहंकाराच्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो कोणत्याही व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्याने अहंकार सोडण्याचा संकल्प केला.

About V Amit