inspiration

हा निश्चय केला तर वैवाहिक जीवन बनेल सुखमय

जुन्या काळामध्ये एक सैनिक जेव्हा युध्दातून परतला तेव्हा पासून त्याचा व्यवहार पूर्णतः बदलला होता. आता तो लहान-लहान गोष्टींवर देखील चिडत होता आणि प्रत्येक बाबतीत रागराग करत होता. यामुळे घरामध्ये तणाव वाढला होता, पत्नीला समजत नव्हते कि पतीला शांत कसे करावे. तेव्हा शहरामध्ये एक प्रसिध्द संत आले. त्या संत महात्म्या बद्दल बोलले जात होते कि ते पती-पत्नी मधील प्रेम टिकवण्यासाठी जडीबुटी देत होते. महिलेने सगळी परस्थिती त्या माहात्म्यास सांगितली.

महात्मा महिलेला म्हणाले युध्दा मध्ये भयंकर हिंसा पाहिल्यामुळे पतीचा स्वभाव आक्रमक आणि हिंसक झाला आहे. आपण त्याचा उपचार करू शकतो, पण तो अत्यंत कठीण आहे कदाचित तो उपाय तू करू शकणार नाहीस.

महिला म्हणाली कितीही कठीण उपाय असला तरी मी तो करेल कारण मला माझे पती पूर्वी सारखे प्रेमळ आणि समंजस स्वभावाचे हवे आहेत. त्यासाठी मी काहीही करू शकते.

महिलेचा निर्धार पाहून महात्मा म्हणाले तुझा निश्चय पाहून आनंद झाला पण हा उपाय खरोखरच अतिक्षय कठीण आहे कारण या उपायासाठी तुला एका जिवंत सिंहाचे केस काढून आणावे लागतील.

महिला हे ऐकून थक्क झाली आणि म्हणाली महाराज हे तर फारच कठीण आहे, मी सिंहाचे केस कसे आणू शकते.

महात्मा म्हणाले बघ मी तुला पहिलेच सांगितले होते हे अतिक्षय कठीण काम आहे आणि तू ते करू शकत नाहीस. पण तुझा निर्धार पाहून मी उपाय सांगितला, आता हे केवळ तुझ्या हातात आहे कि हा उपाय करून तुला तुझा पहिल्या प्रमाणे प्रेमळ आणि समंजस पती मिळवायचा आहे का आताचा रागीट आणि चिडचिडा स्वभाव असलेल्या पती सोबत जुळवून घ्यायचे.

त्यावर महिला म्हणाले गुरुदेव मला माझे पूर्वी सारखे प्रेमळ स्वभावाचे पतीच पुन्हा पाहिजे आहेत आणि त्यासाठी हा उपाय देखील मी करेल. भलेही त्यासाठी मला सिंहाचा केस आणायला लागणार असेल तरी तो मी तो घेऊन येईल.

महिलेने निश्चय केल्या प्रमाणे ती जंगला मध्ये गेली पहिल्या दिवशी ती सिंहाची डरकाळी ऐकून घाबरली आणि घरी परत आली. पण नंतर दुसऱ्या दिवसा पासून तिने हिम्मत केली आणि सिंहासाठी मांस घेऊन जाऊ लागली. हळूहळू तिच्या मनातील सिंहा बद्दलची भीती कमी झाली आणि सिंहाला देखील हळूहळू जाणीव होऊ लागली कि त्याच्या आजूबाजूला मानव आहे.

हळूहळू महिला सिंहाला मांसाचा तुकडा जवळ जाऊन फेकू लागली. सिंह दररोज ते मांस खात असे महिलेला कोणतीही इजा करत नसे, हळूहळू सिंह आणि महिले मध्ये मैत्री झाली. एक दिवस महिलेने सिंहाचा केस तोडला.

केस घेऊन महिला सरळ त्या महात्म्या जवळ आली. सिंहाचा केस माहात्म्यास देऊन ते म्हणाली महाराज त्वरित उपाय करून मला माझे पूर्वी सारखे प्रेमळ पती मिळवण्यासाठी मदत करावी. हे ऐकून महाराजांनी जवळच जळत असलेल्या आगी मध्ये तो केस टाकला आणि हसू लागले. हे पाहून महिलेला प्रचंड राग आला. ती म्हणाली गुरुदेव मी मोठ्या प्रयत्नाने सिंहाचा केस आणला होता आणि तुम्ही तो आगीच्या स्वाधीन केलात. तुम्ही माझ्या सोबत धोका केला आहे.

हे ऐकून महात्मा म्हणाले तू अशी क्रोधीत होऊ नकोस तू जो उपाय केला आहे तो पूर्ण झालेला आहे आणि त्याचा फायदा देखील तुला नक्की मिळणार आहे. हे ऐकून महिला गोंधळली आणि तिला काही समजेनासे झाले. महात्म्याच्या हे लक्षात आले त्यांनी महिलेला सांगितले तू एका हिंस्र आणि जंगली सिंहाला काबू मध्ये आणून त्याचा केस काढू शकतेस तर तुझ्या पतीला देखील नक्कीच काबू मध्ये आणू शकतेस.

तू सिंहाला ज्याप्रमाणे आपल्या प्रेमळ स्वभावाने काबू मध्ये केले त्याच प्रेमळ स्वभावाने आपल्या पती सोबत राहा. तो क्रोधीत झाला तरी त्यास प्रेमाने सामोरी जा कारण क्रोधीत होणे हा त्याचा स्वभाव झालेला आहे. तो स्वभाव तुला आपल्या प्रेमाने बदलायचा आहे जसे तू त्या क्रोधी आणि हिंसक स्वभावाच्या सिंहाचा स्वभाव बदलला आणि त्याला देखील प्रेमळ बनवलेस कि त्याने तुला आपला केस तोडल्या नंतर देखील काहीच केले नाही.

महिलेला महात्म्याचे म्हणणे समजले होते. त्यादिवसापासून पत्नीने ठरवले कि पतीच्या क्रोधाचे उत्तर हे प्रेम आहे आणि काही दिवसातच पतीचे हृद्य परिवर्तन झाले आणि दोघांचे वैवाहिक जीवन सुखमय झाले.

कथेचे सार : या कथेतून आपण शिकू शकतो कि क्रोधाचे उत्तर प्रेम आहे, शांती आहे. जर क्रोधास प्रेम हे उत्तर दिले तर वाद होऊ शकत नाही वर समोरील व्यक्तीचे हृद्य परिवर्तन होऊ शकते.जर हा नियम आपण आपल्या वैवाहिक आणि व्यावहारिक जीवनात देखील अवलंबला तर जीवनात सुख आणि शांती राहील. कोणतेही वाद विवाद राहणार नाहीत.


Tags
Show More

Related Articles

One Comment

Back to top button