Connect with us

लहान मुलांना लहानपणीच चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे ते मोठे होऊन चांगले कामे करतील

Inspiration

लहान मुलांना लहानपणीच चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे ते मोठे होऊन चांगले कामे करतील

जर मुलांना लहानपणापासूनच चांगल्या गोष्टी शिकवल्यातर ते मोठे होऊन चांगले व्यक्ती बनतील आणि चांगली कामे करतील. ज्यामुळे घराचे आणि समाजाचे कल्याण होईल. मुलांना वाईट गोष्टींपासून वाचवले पाहिजे, अन्यथा ते वाईट गोष्टींकडे आकर्षित होऊ लागतात. खालील गोष्टी मधून आपण पाहू मुलांना चांगल्या गोष्टी कश्या समजावू शकतो.

जुन्या काळी एक गुरु आपल्या शिष्यांच्या सोबत भिक्षा मागत-मागत एका घराच्या बाहेर पोहचले. त्यांनी भिक्षा मागण्यासाठी आवाज दिला तेवढयात एक लहान मुलगी बाहेर आली आणि म्हणाली बाबा आम्ही फार गरीब आहोत, आमच्याकडे देण्यासाठी काहीही नाही. तुम्ही पुढे जावे.

त्यानंतर गुरु मुलीला म्हणाले, नकार देऊ नकोस, काही नाही आहे तर आपल्या अंगणातील थोडीशी माती तरी दे.

लहान मुलीने त्वरित आपल्या अंगणातील एक मुठ माती उचलली आणि भिक्षा पात्रा मध्ये टाकली.

गुरूंनी आशीर्वाद दिले आणि पुढे निघाले.

काही वेळ चालल्या नंतर शिष्य गुरूला म्हणाले कि गुरुजी माती पण काय घेण्याची वस्तू आहे का? आपण भिक्षे मध्ये माती का घेतली?

गुरूने आपल्या शिष्याला सांगितले कि आज ती मुलगी लहान आहे आणि जर ती नकार देणे शिकली तर मोठी झाल्यावर देखील ती कोणासही दान नाही देणार. आज तिने दान म्हणून थोडीशी माती दिली आहे, यामुळे तिच्या मना मध्ये दान देण्याची भावना जागृत होईल. ती जेव्हा मोठी होऊन सामर्थ्यवान होईल तेव्हा ती फळ-फुल आणि धन देखील दान देईल.

कथेचे सार : या लहानश्या कथेची शिकवण हीच आहे कि मुलांना लहानपणीच चांगली कामे करणे शिकवली पाहिजेत. जर लहानपणी त्यांना चांगली कामे करण्यासाठी प्रेरित केले तर ते मोठे झाल्यावर चांगले व्यक्ती होतील आणि वाईट कामांपासून दूर राहतील. आपण जेव्हाही दान करतो तेव्हा लहान मुलांकडून दान केले पाहिजे यामुळे ते दुसऱ्याची मदत करणे शिकतात.

More in Inspiration

Trending

To Top