inspiration

विश्वास ठेवा तो कधीही कोणाचे वाईट होऊ देत नाही

एक गोष्ट ऐकण्यात आली ती आज तुम्हाला सांगत आहे तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि काही शिकण्यास देखील मिळेल. ही काही राजा राणीची गोष्ट नाही तर सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे. जी एका व्यक्तीने आम्हाला सांगितली आणि आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ही गोष्ट किती खरी आहे किंवा खोटी आहे हे आम्हास माहित नाही पण या घटनेतून जे शिकण्यास मिळते ते अमूल्य आहे. चला तर पाहू ती कथा किंवा घटना काय आहे.

एक दिवस एक व्यक्ती फळ खरेदी करण्यासाठी बाजारात गेला त्याला तेथे एक फळांची हातगाडी दिसली त्या गाडीवर विक्रीसाठी वेगवेगळी फळे व्यवस्थित मांडून ठेवलेली होती. पण तेथे विक्रेता दिसत नव्हता त्यामुळे व्यक्तीने जवळ जाऊन पाहिले तर त्याला गाडीवर एक फलक लिहिलेली दिसली. त्या फलकावर लिहिलेला मजकूर पुढील प्रमाणे होता.

साहेब जर तुम्ही घाई मध्ये असाल तर कृपया आपल्या हातांनी फळे मोजून/वजन करून घ्यावीत आणि पुढे ठेवलेल्या रेट कार्ड प्रमाणे जेवढे पैसे होतात ते गादीच्या खाली ठेवा आणि निघून जावे कारण मला अधूनमधून घरी जावे लागते कारण माझी आई वृध्द आहे आणि घरी तिला सांभाळण्यासाठी दुसरे कोणीही नाही आहे. त्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी तिला अन्नपाणी देण्यासाठी, औषधे देण्यासाठी आणि बाथरुमला घेऊन जाण्यासाठी घरी जावे लागते. त्यामुळे आपण असे करावे.

त्याच सोबत खाली अजून एक ओळ लिहिलेली होती. त्यामध्ये असे लिहिले होते कि जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण पैसे न ठेवता फळे घेऊन जाऊ शकता आपल्याला परवानगी देण्यात येत आहे.

हे सगळे वाचल्यावर व्यक्तीच्या मनात प्रश्न आला कि असा कोण आहे ज्यास आजकालच्या युगामध्ये देखील लोकांवर एवढा विश्वास आहे. व्यक्तीने आजूबाजूला पाहिले तेथे कोणीही नव्हता त्यामुळे फळे वजन केली आणि रेट कार्ड प्रमाणे पैसे ठेवण्यासाठी गादी उचलली तर तेथे शंभरच्या दोन तीन नोटा, दहाच्या पाच सहा नोटा आणि काही चिल्लर अगोदरच तेथे होते त्यामुळे मला समजले कि लोक फळे घेत आहेत आणि पैसे देखील ठेवून जात आहेत. व्यक्तीने देखील पैसे ठेवले आणि घरी निघून गेला. पण त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न तसाच होता कि हा फळवाला कोण आहे ज्यास आजकालच्या युगामध्ये देखील लोकांवर एवढा विश्वास आहे.

रात्री जेवण झाल्यानंतर व्यक्ती फिरण्यास निघाला तेव्हा त्याला ती फळांची गाडी घेऊन जातांना तो फळ विक्रेता दिसला. त्या व्यक्तीने फळ विक्रेत्याला आवाज दिला. त्यावर फळ विक्रेता म्हणाला साहेब फळे नाही आहेत सगळ्यांची विक्री झाली. त्यावर व्यक्ती म्हणाला नको मला फळे नको ती मी सकाळीच घेतली आणि गादी खाली पैसे देखील ठेवले. पण मला तुमच्या सोबत थोडे बोलायचे आहे असे म्हणून व्यक्ती ने त्यास चहाच्या टपरीवर बसून बोलण्याची इच्छा दर्शवली. फळ विक्रेता देखील तयार झाला व त्यांचे बोलणे सुरु झाले.

व्यक्तीने फळ विक्रेत्यास विचारले मी सकाळी फळ खरेदी करण्यासाठी बाजारात गेलो तेथे तुमची फळांची गाडी तो फलक, रेट कार्ड इत्यादी पाहिले. त्यानुसार मी फळे घेतली आणि पैसे गादी खाली ठेवली पण तुम्हाला नाही वाटत का कि आजकालच्या युगामध्ये लोक फळे घेऊन जातील आणि पैसे ठेवणार नाही आणि ज्यांनी पैसे ठेवले आहेत ते चोरी देखील होऊ शकतात. त्यावर फळ विक्रेत्याने व्यक्तीला स्वता बद्दल जे सांगितले ते लक्षपुर्वक वाचा.

फळ विक्रेत्याने सांगितले साहेब मागील दोन तीन वर्षा पासून माझी आई आजारी राहते, मला कोणीही मुलगा किंवा मुलगी नाही. माझ्या पत्नीचे निधन झाले आहे. आता फक्त मी आहे आणि माझी आई आहे. एक दिवस आईचे पाय दाबताना आईला मी विचारले तू नेहमी मला म्हणते तू घरात राहत जा तू येथे नसतोस तेव्हा मला घाबरायला होते, मन लागत नाही. पण आई तुला माहित आहे माझ्या जवळ काही जास्त पैसे नाहीत जर मी फळ विकायला गाडीवर नाही गेलो तर पैसे कसे मिळतील. जर पैसे नसले तर आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि तुमच्या औषधाचा खर्च कसा होईल.

यावर माझ्या आईने उत्तर दिले जी परमेश्वरावर खूप विश्वास ठेवते ती मला म्हणाली तू बाजारात गाडीवर फळे विक्रीला ठेव आणि तेथे एक फलक लाव आणि ग्राहकांना पैसे तेथे ठेवण्यास सांग आणि पहा जेव्हा संध्याकाळी जेव्हा तू गाडी बंद करण्यासाठी जाशील तेव्हा तुझा एक रुपया देखील इकडचा तिकडे झालेला नसेल. त्यावर मी आईला म्हणालो आई हे काय सांगत आहेस तू आजकालच्या जमान्यात जेथे चोरी आणि फसवणूक सामान्य आहे तेथे जर गाडीवर कोणीही नसेल तर चोर आणि फसवणारे गाडीवरील फळे आणि पैसे घेऊन जातील. शिवाय जर गाडीवर विक्रीसाठी कोणीही नसेल तर ग्राहक कसे येतील. त्यावर आई म्हणाली फालतू चर्चा करू नकोस मी जसे सांगितले तसे कर आपल्या नशिबात जेवढे आहे तेवढे परमेश्वर आपल्याला नक्की देईल.

आईच्या म्हणण्या प्रमाणे मागील दोन वर्षा पासून मी रोज सकाळी गाडी घेऊन बाजारात जातो फळे विक्रीसाठी सजवून ठेवतो. गाडीवर फलक लावतो आणि घरी परत येतो आणि संध्याकाळी गाडी बंद करण्यासाठी जातो. लोकांना वाटत असेल कि अधूनमधून मी गाडीवर येत असेल पण मी तसे करत नाही मी डायरेक्ट संध्याकाळी गाडी बंद करण्यासाठी जातो. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तेथील एक रुपया देखील इकडचा तिकडे होत नाही तर लोक आईसाठी जास्त पैसे ठेवून जातात तर लहान मुले गाडीवर आईसाठी गोळ्या चॉकलेट ठेवून जातात. एकदा एक मुलगी पुलाव ठेवून गेली आणि सोबत एक चिठ्ठी ठेवली कि हे तुमच्या आईसाठी तर एकदा एक डॉक्टर आपला नंबर ठेवून गेले आणि सोबत लिहिले होते कधीही आपल्या आईला गरज पडली तर फोन करा. तेव्हा पासून हे सगळे असेच सुरु आहे मी सकाळी गाडी लावतो आणि संध्याकाळी बंद करतो आणि दिवसभर आईची सेवा करतो तिच्या इच्छे प्रमाणे तिच्या सोबत राहतो.

काय शिकण्यास मिळाले : आपल्यावर विश्वास ठेवा, आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा आपल्या नशिबात जेवढे आहे ते आपल्याला मिळणारच आहे कदाचित थोडा वेळ लागेल पण आपला विश्वास कमी होऊ देऊ नका.

Related Articles

Back to top button