inspiration

आता जीवनात फक्त चांगल आणि चांगलच होईल

एक उत्तम वाक्य वाचण्यात आले “जेथे विश्वास आहे तेथे मार्ग निघतोच ” जर तुम्ही विचार करत असाल कि तुमच्या आयुष्यात सगळ काही वाईट होत आहे आणि यापेक्षा वाईट काही असूच शकत नाही. तर विश्वास ठेवा आता तुमच्या सोबत फक्त आणि फक्त चांगलच होईल.

एकदा एका राजाने आपल्या राज्यातील एका गावामधील रस्त्यात एक मोठा दगड सेवकांना ठेवण्यास सांगितला आणि राजा स्वता रस्त्याच्या किनारी एका झाडाच्या मागे लपून सगळेकाही पाहत होता. रस्त्याने लोक येत जात होते रस्त्यामध्ये ठेवलेल्या मोठ्या दगडाकडे सगळ्या लोकांचे लक्ष जात होते. काही लोक शांत पणे तेथून जात होते तर काही लोक बोलत होते कोणी हा दगड मध्ये ठेवला. काही म्हणत होते कसा आपला राजा आहे रस्त्यावर पडलेला दगड सुध्दा त्याला बाजूला करून घेता येत नाही आहे इत्यादी.

त्याच मार्गाने एक शेतकरी आपल्या डोक्यावर भाजीपाल्याची टोपली घेऊन भाजी विकण्यास जात होता. त्याने देखील हा रस्त्यामध्ये पडलेला मोठासा दगड पाहिला. पण त्याने शांत पणे निघून जाणे किंवा राजाला अपशब्द बोल्या एवजी स्वता तो दगड रस्त्याच्या बाजूला करण्याचे ठरवले. त्यासाठी शेतकऱ्याने आपल्या डोक्यावरील टोपली जमिनीवर ठेवली आणि दगड रस्त्याच्या किनारी करण्यासाठी प्रयत्न करू लागला. दगड मोठा होता त्यामुळे त्याला जरा जास्त जोर लावावा लागला त्यानंतर तो दगड थोडासा सरकला व नंतर हळूहळू शेतकऱ्याने तो दगड रस्त्याच्या किनारी केला.

दगड रस्त्याच्या किनारी लावल्यानंतर शेतकरी आपली टोपली उचलण्यासाठी आला त्याने टोपली उचलली तर त्याला दिसले कि जेथे मोठा दगड होता तेथे एक पिशवी आहे. शेतकऱ्याने पिशवी उघडून पाहिली त्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या आणि सोबत एक पत्र होते. पत्रामध्ये लिहिले होते, ‘मी तुमची परीक्षा घेत होतो आणि मला पहायचे होते कि या समस्यादायक दगडाला दूर करून यशाच्या जवळ पोहचतो.

कथेचे सार : मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये समस्यांचा एक दगड रस्त्यामध्ये ठेवलेला आहे जर आपणही हा दगड बाजूला करत असाल तर चांगली गोष्ट आहे आणि जर आपण प्रयत्न करत नसाल तर तो प्रयत्न सुरु करा कारण हा समस्यांचा दगड आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा बाजूला होईल आणि ते मिळेल तुम्हाला जे तुम्हाला पाहिजे आहे.

Tags

Related Articles

Back to top button