inspiration

शेत मजूर – प्ररणादायी कथा

फार पूर्वीची गोष्ट आहे. आइसलँडच्या उत्तरेकडील भागात एक शेतकरी राहत होता. त्याला त्यांच्या शेतात काम करण्यासाठी मजूर पाहिजे होता. परंतु अश्या धोकादायक ठिकाणी जेथे नेहमी वादळे आणि जोरदार हवा सुटते. अश्या ठिकाणी कोणी मजूर काम करण्यास तयार होत नव्हते.

शेतकऱ्याला मजुराची अत्यंत गरज असल्यामुळे त्याने शहरातील वर्तमानपत्रा मध्ये जाहिरात दिली. यामध्ये शेतकऱ्याने लिहले एक शेत मजूर पाहिजे आहे. नोकरीची जाहिरात पाहून अनेक लोक Interview देण्यासाठी आले परंतु प्रत्येक व्यक्ती कोठे काम करायचे आहे हे ऐकून काम करण्यासाठी नकार देत असे.

अखेरीस एक सडपातळ आणि अशक्त व्यक्ती शेतकऱ्याकडे आला.

शेतकऱ्याने त्याला विचारले, “तू यापरिस्थितीत काम करू शकतोस का?”

“हो, फक्त हवा वाहते तेव्हा मी झोपतो.” त्याव्यक्तीने उत्तर दिले.

शेतकऱ्याला हे उत्तर थोडे उद्धट वाटले पण शेतकऱ्याला मजूर पाहिजे होता आणि त्याच्या कडे कोणीही काम करण्यास तयार होत नव्हता म्हणून शेतकऱ्याने त्याला कामावर ठेवले.

मजूर मेहनती निघाला. तो दिवसभर शेतात काम करत असे. शेतकरी त्याच्या कामावर अत्यंत खुष होता. काही दिवसांनी एक दिवस अचानक खूप जोरदार वारा सुटला. हे पाहून शेतकरी समजला थोडयाच वेळात वादळ येण्याची शक्यता आहे म्हणून तो शेतात मजुराच्या झोपडीत गेला.

“अरे लवकर उठ बघतो आहेस ना वारा सुटला आहे. लवकरच वादळ येईल. त्याआधी शेतात काढून ठेवलेले पिक बांधून ठेव गेट दोरखंडाने कसून बाधून ठेव…..” शेतकरी ओरडला.

मजूर हळूच वळला आणि बोलला, “मालक, मी तुम्हाला पहिलेच सांगितले होते की जेव्हा वारा वाहतो मी झोपतो…”

हे ऐकून शेतकरी अत्यंत रागावला. वादळ आले तर प्रचंड नुकसान होईल पाऊस पडून सर्व काढलेल पिक भिजेल फार मोठ नुकसान होईल. शेतात केलेली सर्व मेहनत वाया जाईल. अश्या मजुराला तर गोळी घातली पाहिजे असे त्याचं मन करत होते . परंतु वेळ कमी होता म्हणून शेतकरी स्वताच शेतात पिक झाकण्यासाठी गेला. तेथे त्याने पाहिले पिक व्यवस्थित बांधून झाकून ठेवले होते. शेताचे मेन गेट दोरखंडाने कसून बांधले होते. कोंबड्यांना झाकून ठेवले होते आणि सर्व कामे व्यवस्थित करून ठेवली होती. नुकसान होण्याचा काही प्रश्नच नव्हता.

आता शेतकरी ही समजला की मजूर “जेव्हा वारा वाहतो मी झोपतो.” का म्हणाला होता, आणि मग शेतकरी ही  कोणतीही काळजी न करता झोपला.

तात्पर्य : जीवनात सुध्दा अशी अनेक संकटे येतात. पण गरज आहे ती मजूरा प्रमाणे पहिलेच सर्व तयारी करून ठेवण्याची मग तुम्ही आम्ही पण संकट समयी आरामात झोपू शकतो.


Show More

Related Articles

Back to top button