Connect with us

आपल्या आईचे भक्त आहेत हे बॉलीवूडचे तारे, चवथ्या नंबरवाला तर आहे आईचा लाडका

Celebrities

आपल्या आईचे भक्त आहेत हे बॉलीवूडचे तारे, चवथ्या नंबरवाला तर आहे आईचा लाडका

आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते असते. आई आपल्या मुलाना प्रेमाने आणि आदराने लहानाचे मोठे करते अगदी तशीच इच्छा आईची असते कि मुलगा मोठा झाल्यावर त्याने देखील तिची तशीच काळजी घेतली पाहिजे. परंतु अनेक आईंचे मन हे मोठे झाल्यावर त्यांची मुले दुखावतात. काही लोक आई-वडिलांची काळजी मनापासून घेतात तर काही लोकांचे आई-वडील आपल्या मुलाचा चेहरा पाहण्या पासून देखील वंचित राहतात आणि त्याच्या आठवणी मध्ये अश्रू ढाळत राहतात. पण बॉलीवूड मधील काही स्टार्सचा विचार केला तर समजेल कि हे स्टार्स आपल्या आईचे भक्त आहेत आणि आईला देवा पेक्षा कमी दर्जा त्यांच्या नजरेत नाही. आपल्या आईचे म्हणणे ते ऐकतात. जगात या स्टार्सचा कितीही रुबाब असला तरी घरी गेल्यावर ते आईचा ओरडा खातात.

हे स्टार्स आहेत आपल्या आईचे भक्त

शाहरुख खान

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याबाबतीत कमनशिबी आहे आणि हे आम्ही नाही तर स्वतः शाहरुख म्हणतो. शाहरुख जेव्हा 15 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि जेव्हा त्याचे वय 21 होते तेव्हा आईने जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून शाहरुख आपली बहिण आणि कुटुंबांसोबत राहतो. परंतु वेळोवेळी शाहरुख आपल्या आई-वडिलांची आठवण काढायला विसरत नाही.

अमीर खान

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून अमीर खान प्रसिध्द आहे. अमीर देखील आपल्या आईवर खूप प्रेम करतो. अमीर आणि त्याच्या आईचे नाते हे त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे आपल्या जीवनातील बरेचसे निर्णय तो आईच्या सल्ल्याने घेतो. अमीरची आई बऱ्याच कमी वेळा मिडीया समोर आलेली आहे.

ऋतिक रोशन

ऋतिक रोशन आपल्या आई सोबत बऱ्याचदा जिम मध्ये वर्कआउट करताना दिसतो. ऋतिक आपल्या आईच्या खूप जवळ आहे आणि ऋतिकच्या फिटनेसचे रहस्य त्याची आई आहे कारण त्याची डाइट तीच ठरवते आणि लक्ष देते.

सलमान खान

तसे तर हे सर्व जगाला माहित आहे कि सलमान खान को रोकाना नामुमकीन है. पण जर सलमानचे आई-वडील त्याला एखादी गोष्ट सांगत असतील तर ते टाळणे सलमानसाठी शक्य नाही आहे. सलमानच्या घरामध्ये त्याचे वडील सलीम यांचेच चालते. सलमान खान आपली आई सलमा खानवर खूप प्रेम करतो आणि तिला फुला प्रमाणे जपतो. एवढेच नाही तर सलमान त्याची सावत्र आई हेलन वर देखील खूप प्रेम करतो आणि सलमान सलमा-हेलन दोघांच्यासाठी जीव कि प्राण आहे.

कतरिना कैफ

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफची आई ब्रिटीश मुळाची आहे तर वडील भारतीय आहेत. कतरिनाने आपल्या जीवनातील बराचसा काळ लंडन मध्ये घालवला आहे. तेथे तिच्या वडिलांचा बिजनेस आहे आणि आई त्यामध्ये वडिलांना मदत करते. कतरिनाचे आईवर खूप प्रेम आहे आणि बऱ्याचदा इवेन्ट मध्ये ती आई सोबत दिसते.

दीपिका पादुकोण

बॉलीवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोणच्या वडिलांना तर तुम्ही बऱ्याचदा तिच्या सोबत पाहिले असेल पण आई सोबत क्वचितच एखाद्या इवेन्ट मध्ये दिसली असेल. परंतु दीपिकाच्या होणाऱ्या लग्नाची पूर्ण तयारी तिची आईच करत आहे. त्यामुळे आता मिडियाचे लक्ष दीपिकाच्या आईकडे राहील.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top