health

पोटाची चरबी कमी करण्याचा उपयुक्त नं.1 फॉर्म्युला, घरीच बनवा अगदी सहज? वाचा सत्य

बॉडी मध्ये जमा झालेली अतिरिक्त चर्बी वजन वाढवून शरीर बेडौल करते आणि सोबतच अनेक आजार घेऊन येते. यावर करा अगदी सोप्पा आणि प्रभावी उपाय. या फोर्म्युल्याचे आहेत इतरही अनेक फायदे. पहा कसे तयार करावे हे आयुर्वेदिक औषध. या आशयाच्या पोस्ट मागील काही दिवसा पासून वायरल होत आहे. चला पाहू त्याचे सत्य परंतु तत्पूर्वी त्यामध्ये काय दावा केला जातो ते पाहू.

खालील माहितीला आयुर्वेदिक फॉर्म्युला सांगितले जात आहे

आवश्यक साहित्य : हळद 100gm, दालचीनी 100gm, मेथीदाणे 200gm, काळे जीरे 100gm, सुंठ 50gm, ओवा 100gm, काळी मिरी 20gm

कसे बनवावे : या सर्व साहित्यास मिक्सरमध्ये बारीक पावडर करावे. या पावडरीला एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

कसे घ्यावे : कोमट पाण्यामध्ये एक चमचा एप्पल साइडर विनेगर आणि एक चमचा बनवलेली पावडर मिक्स करून सकाळ-संध्याकाळ जेवणाच्या अगोदर घ्यावे.

पावडरचे फायदे

वजन कमी करतो : या पावडरीला रेग्युलर घेण्यामुळे बॉडीतील जमा एक्स्ट्रा चरबी हळूहळू विरघळून निघून जाते.

डायबेटीस सुरक्षा : हा फॉर्म्युला बॉडीतील शुगर लेवल बैलेंस ठेवतो आणि वाढलेल्या शुगरला नॉर्मल करून डायबेटीस पासून सुरक्षा करतो.

ग्लोइंग स्कीन : यामुळे बॉडीतील टोक्सिंस निघून जातात. स्कीन चांगली होते. साधारण आजारपण दूर राहते.

एंटी एजिंग : यामधील एंटी ऑक्सीडेंटस तत्व एजिंग प्रोसेस स्लो करते. तुम्ही दिसाल दीर्घकाळ तरुण.

हेल्दी लिवर आणि किडनी : यामुळे लिवर आणि किडनीवर ताण टाकणारे टोक्सिक पदार्थ बॉडीच्या बाहेर जातात आणि ऑर्गन हेल्दी राहतात.

उत्तम पचनशक्ती : या फोर्मुल्याने पचनशक्ती चांगली होते. गैस, बद्धकोष्ठ, एसिडीटी, आंबट डकार सारखे प्रोब्लेम दूर होतात.

काय आहे सत्यता-

याबद्दल फॅक्ट क्रिसेंडोने पडताळणी केल्यावर ही पोस्ट मधील माहिती खोटी असल्याचे समजले. काही तज्ञ डॉक्टरांच्या अनुसार एप्पल साइडर विनेगर हे आयुर्वेदिक नाही त्यामुळे हा फॉर्म्युला आयुर्वेदिक नाही. तसेच या फोर्म्यूलामुळे चरबी विरघळेल किंवा नाही हे ठाम पणे सांगता येत नाही.

शुगर लेवल केवळ या औषधामुळे नॉर्मल राहते असे म्हणणे चुकीचे आहे त्यासाठी व्यायाम, आहार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले औषध यामुळे नॉर्मल राहू शकते.तसेच या फॉर्म्युलामुळे एजिंग प्रोसेस स्लो होत नाही,लिव्हर आणि किडनीवरील ताण कमी होतो याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.

सगळ्यात महत्वाचे हे औषध घेतल्यामुळे पोटातील गैस कमी झाल्याने पोटाचा घेर थोडा कमी वाटू शकतो पण या फॉर्म्युलामुळे पोटाची चरबी कमी होईल असा दावा करता येत नाही.

महत्वाची सूचना: येथे नमूद केलेले सर्व आयुर्वेदिक उपाय पूर्णपणे सुरक्षित आहेत परंतु तरीही कोणताही उपाय करण्याआधी आपल्या जवळच्या प्रमाणित आयुर्वेदाचार्य किंवा चिकित्सक कडून एकवेळ सल्ला घेऊनच कोणताही उपाय करा. हे आर्टिकल फक्त माहितीसाठी आहेत.कोणताही आयुर्वेदिक उपाय चुकीच्या पद्धतीने वापरात आणल्यास आमची कोणतीही जबाबदारी नाही आहे.

Disclaimer : येथे दिलेली सर्व लेख वाचकांच्या माहितीसाठी आणि ज्ञानवर्धन करण्यासाठी आहेत आणि याची कोणतीही नैतिक जिम्मेदारी marathigold.com आणि लेखकाची नाही. तुम्हाला विनंती आहे की कोणताही उपाय करण्याआधी आपल्या जवळच्या प्रमाणित आयुर्वेदाचार्य किंवा चिकित्सक कडून एकवेळ सल्ला घेऊनच कोणताही उपाय करा. कारण तुमचा चिकित्सक तुमच्या आरोग्याला चांगल्या पद्धतीने समजतो आणि त्याला काही विकल्प नाही.


Show More

Related Articles

Back to top button