Connect with us

आयुष्यात काही मोठे करायचे असेल तर, ही गोष्ट एकदा वाचलीच पाहिजे

Inspiration

आयुष्यात काही मोठे करायचे असेल तर, ही गोष्ट एकदा वाचलीच पाहिजे

जुन्या काळा मध्ये एक राजा आपल्या शेजारील राज्यामध्ये अतिथी म्हणून गेला. शेजारील राज्याच्या राजाने त्याचा चांगला पाहुणचार केला. काही दिवस राहिल्यानंतर जेव्हा राजा आपल्या राज्यात जाण्यास निघाले तेव्हा शेजारील राज्याच्या राजाने त्यास दोन सुंदर कबूतर भेट म्हणून दिले.

राजा त्या कबुतरांना घेऊन आपल्या राजमहाली आला. तेथे एक सेवक त्या कबुतरांच्या देखभालीसाठी नियुक्त केला. सेवक सकाळ-संध्याकाळ कबुतरांना दाणा-पाणी देत असे. काही दिवसा नंतर जेव्हा राजा कबुतरांना पाहण्यासाठी पोहचला.

तेव्हा सेवकाने सांगितले एक कबूतर उंचावर उडतो, पण दुसरा कबूतर झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसतो. हे समजल्यावर राजाला दुखः झाले कि दुसरा कबूतर उंच उडत नाही तर फक्त जवळील झाडाच्या फांदीवर बसून राहतो.

राजाने त्वरित आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि दुसरा कबूतर उंच का उडत नाही हे शोधण्यासाठी सांगितले. पण मंत्री हे शोधण्यात अपयशी ठरले. तेव्हा राजाला त्यांनी सल्ला दिला कि आपण पक्षी तज्ञास बोलावून समस्या पाहण्यास सांगू.

राजाने एका शेतकऱ्यास बोलावले जो एक उत्तम पक्षी तज्ञ होता. त्याने कबुतराच्या आजूबाजूचे क्षेत्र पाहिले आणि ज्या झाडाच्या फांदीवर कबूतर बसत होता ती फांदी कापून टाकली.

यानंतर दुसरा कबूतर देखील आकाशात उंच उडू लागला. शेतकऱ्याने राजास सांगितले कि कबूतर या फांदीच्या मोहात पडला होता, उडण्याची जोखीम घेण्यासाठी तो घाबरत होता, जेव्हा ही फांदी कापली तेव्हा त्याच्याकडे उंच उडण्या शिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. यामुळे तो आता उंच उडत आहे. हे पाहून राजा आनंदी झाला आणि त्याने शेतकऱ्यास सुवर्ण मुद्रा देऊन त्याचा सन्मान केला.

कथेचे सार : या कथेचा मूळ संदेश हा आहे कि लोक जोखीम घेण्यास घाबरतात. आपल्या कंफर्ट झोन मधून बाहेर निघू इच्छित, ते शिखरा पर्यंत पोहचू शकत नाहीत. जर तुम्ही काही मोठे मिळवू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला जोखीम घ्यावीच लागते, तेव्हाच आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या गोष्टीची वाट पाहत बसले नाही पाहिजे कि कोणी आपली फांदी कापेल, तेव्हा आपण उंच उडू.

More in Inspiration

Trending

To Top