मोरपंख बद्दलचे हे चमत्कारिक तोडगे, जे चमकवतील आपले नशीब

0
28

मोरपंख (मोरपीस) हे अतिशय शुभ मानले जाते आणि हे जवळ असल्याने वाईट शक्ती दूर राहतात. अनेक देवतांना देखील मोरपंख प्रिय आहे आणि हे मोरपीस माता सरस्वती, श्रीकृष्ण, माता लक्ष्मी आणि कार्तिकस्वामी यांच्या जवळ नेहमी असते. मोरपंख संबंधित अनेक तोडगे देखील आहेत आणि यांच्या मदतीने अनेक समस्या दूर करता येऊ शकतात.

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी

घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असल्यास आपण आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्या मध्ये एक मोरपीस ठेवावे. मोरपीस ठेवल्याने घराचा वास्तुदोष दूर होतो. आग्नेय कोपऱ्याच्या व्यतिरिक्त वाटल्यास मोरपीस आपण देवघरा मध्ये देखील ठेवू शकता.

ग्रहांना शांत ठेवतो

कुंडली मध्ये ग्रहांची चाल बदलल्यामुळे आणि ग्रहांच्या मुले जीवनात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी तोडगा करू शकता. यासाठी आपल्याला एक मोरपंख घेऊन त्यावर 21 वेळा ग्रहांच्या संबंधित मंत्र लिहावा आणि नंतर हे मोरपंख आपल्या घराच्या देव्हाऱ्यात ठेवा. देवघरात मोरपंख ठेवल्याने आपले ग्रह शांत होतील आणि आपण ग्रहांच्या प्रकोपा पासून वाचू शकता.

आर्थिक प्रगतीसाठी

व्यापारामध्ये नफा होत नसल्यास आपण शुक्रवारच्या दिवशी एक मोरपंख आपल्या तिजोरी, लॉकर किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने आपल्याला व्यापारामध्ये लाभ होण्यास सुरुवात होईल आणि आपली आर्थिक स्थिती चांगली होईल.

वाईट नजरे पासून बचाव

अनेक वेळा आपल्याला वाईट नजर लागते आणि नजर लागल्याने आपल्याला नुकसान होते. जर कोणाची वाईट नजर लागली तर त्याने मोरपीस चांदीच्या तावीज मध्ये टाकून त्यास परिधान करावे. असे केल्याने वाईट नजरेचा परिणाम संपुष्टात येईल.

कार्यात यश मिळवण्यासाठी

मंगळवारच्या दिवशी आपण एक मोरपंख हनुमानाच्या पाया जवळ ठेवा आणि 21 वेळा हनुमानाची नावे घ्या. हा तोडगा केल्याने आपल्याला सगळ्या कामामध्ये यश प्राप्ती होईल. परंतु हे लक्षात ठेवा कि जो पर्यंत आपल्याला यश मिळत नाही तो पर्यंत आपल्याला हा तोडगा करायचा आहे.

शत्रूवर विजय मिळवण्यासाठी

आपल्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आपण हा तोडगा करू शकता. या तोडग्या मध्ये आपण मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी एक मोरपंख घेऊन त्यावर शेंदुराने टिळा लावा आणि नंतर हे मोरपंख पाण्यात सोडून द्या.

नकारात्मक उर्जे पासून वाचण्यासाठी

घराच्या मुख्य दरवाजावर मोरपंख लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे सांगितलं जाते कि घराच्या मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि जीव-जंतू प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर एक किंवा तीन मोरपंख आवश्य लावा.

मुख्य दरवाजावर मोरपंख लावताना त्यावर हा मंत्र आवश्य लिहा ॐ द्वारपालाय नम: जाग्रय स्थापयै स्वाहा आणि लाल धाग्याने मोरपंख बांधा.