money

एक सन्मानपूर्ण जीवन जगण्यासाठी किती पैसे आवश्यक असतात?

एक सन्मानपूर्ण जीवन असावे हे तर प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी तो आपल्या पद्धतीने मेहनत देखील करत असतो. आता हे सन्मानपूर्वक आयुष्य म्हणजे काय? याची प्रत्येकाची आपआपली परिभाषा आहे. कोणास गाडी, बंगला आणि सेवेत नोकर असावेत, भरपूर पैसे म्हणजे सन्मानपूर्ण आणि चांगले जीवन वाटू शकते. तर एखाद्यास अन्न, पाणी, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य. त्यास आणि कुटुंबास मिळावे आणि त्यासाठी त्याला कोणतेही अनैतिक काम करावे लागू नये म्हणजे चांगले आयुष्य असू शकते.

खरतर सन्मानपूर्ण आयुष्य आपण काय विचार करतो आणि आपल्या बहुतालचे लोक काय विचार करतात यावर अवलंबून असते. तुम्ही किंवा तुमच्या आजुबाजूचे लोक पैश्यांना आणि झगमगाटीला जास्त महत्व देत असतील तर ते त्यांच्यासाठी चांगले आयुष्य असू शकते परंतु हे मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब केला तेही तेवढेच महत्वाचे आहे. कोणाचा खून किंवा दरोडा टाकून मिळवलेल्या पैश्यातून उभे केलेले घर, गाडी आणि झगमगाट एखाद्यासाठी आपण चांगले आयुष्य घालवत आहोत असे वाटण्यास कारणीभूत ठरू शकते पण सामान्य लोकांच्या नजरेतून या सगळ्याची किंमत शून्य असते ते त्याला फक्त एक खुनी आणि दरोडेखोर म्हणूनच पाहतात.

तर दुसरीकडे जर एखादा व्यक्ती मेहनत मजुरी करून हळूहळू प्रगती करत असेल तर त्याला स्वताला याबद्दल समाधान मिळते आणि लोकांच्या नजरेत देखील त्याच्या बद्दल आदर असतो. त्यामुळे सन्मानपूर्वक आयुष्य जगण्यासाठी किती पैसे आवश्यक आहे हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे कारण जो पर्यंत तुम्ही स्वताला आरशा मध्ये पाहता तेव्हा तुम्हाला स्वता बद्दल आणि स्वता केलेल्या कृत्यांची लाज वाटत नाही तो पर्यंत तुम्ही स्वताच्या नजरेत एक सन्मानपूर्वक आयुष्यच जगत असता भलेही तुमच्या खिशात भरपूर पैसे असो किंवा नसो.

खालील इमेज अतिशय बोलकी आहे. खालील इमेज पाहून तुम्ही सहज सांगू शकता सन्मानपूर्ण आयुष्य कोण जगत आहे.

यावर तुमचे काय मत आहे हे तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता. लेख आवडा असेल तर लाईक आणि शेयर आवश्य करा.


Show More

Related Articles

Back to top button