अत्यंत महत्वाची बातमी : चुकीने अनोळखी अकाउंट मध्ये पैसे पाठवले, तर जाणून घ्या कसे मिळतील परत

0
117

आजकाल ऑनलाईन फ्रॉड भरपूर होतात. पाहता पाहता लोकांच्या डोळ्या समोरून त्यांच्या आयुष्याभराची कमाई लुटल्या जाते. आता आपला देश डिजिटल होत आहे. डिजिटल होण्यामुळे ऑनलाईन पेमेंट आणि मणी ट्रान्सफर करणे हल्ली वाढले आहे. अनेक लोक आपल्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबियांना पैसे देताना ते ऑनलाइन मणी ट्रान्सफर सुविधेचा वापर करतात.

असे केल्यामुळे वेळेची बचत होते. या व्यतिरिक्त लोक आपले मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी आणि वीजेचे बिल इत्यादी भरण्यासाठी मोबाईल बैंकिंग वापरतात, पण काही वेळा असे होते कि लोक चुकीने एखाद्या वेगळ्याच व्यक्तीच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करतात, तर दुसरीकडे कधीकधी लोकांच्या अकाउंट मधून चुकीच्या पद्धतीचा वापर करून पैसे काढले जातात. आपण आपण या समस्ये पासून कसे वाचता येईल हे जाणून घेऊ. ज्यामुळे आपण आल्या मेहनतीच्या कमाईचे संरक्षण करू शकता.

2019 च्या सुरुवातीला मुंबईच्या एका बिजनेसमैन सोबत ऑनलाइन फसवणुकीची केस समोर आली. त्या दरम्यान बिजनेसमैनला रात्री 6 मिस कॉल आले होते. जेव्हा सकाळी उठल्यावर त्याच्या अकाउंट मधून करोडो रुपये काढले गेल्याचे त्याला समजले होते. सतत या प्रकारच्या घटना मध्ये वाढ होत आहे. रिपोर्ट अनुसार 2017-18 दरम्यान 2069 ऑनलाइन फसवणुकीच्या केस समोर आल्या आहेत.

रिजर्व बैंक अनुसार जर आपल्या परमिशन शिवाय कोणीही आपल्या अकाउंट मधून पैसे काढले तर आपण 3 दिवसांच्या आत बैंकेला या घटनेची माहिती देणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे आपले पैसे वाचू शकतात. बैंकेला माहिती दिल्या नंतर बैंक चेक करेल कि काय खरोखरच आपले पैसे चुकीने एखाद्या दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत किंवा नाहीत. किंवा एखाद्याने चुकीच्या पद्धतीने आपल्या अकाउंट मधून पैसे काढले आहेत. चौकशी पूर्ण झाल्या नंतर बैंक आपल्याला पूर्ण पैसे परत करेल. पण यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतील.

पैसे परत मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एटीएम कार्ड नंबर आणि इंटरनेट बैंकिंग सेवा क्लोज करावी लागेल. यानंतर पोलिसात याबद्दल रिपोर्ट नोंदवावी लागेल. रिपोर्ट नोंद केल्या नंतर एफआयआर ची एक प्रत बैंकेत जमा करावी लागेल. बैंक FIR अंतर्गत काढलेल्या पैस्यांची तपासणी करेल.

जर आपल्या सोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली आहे तर आपल्याला आपले पूर्ण पैसे परत मिळतील. पण जर आपण चुकीने एखाद्याच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले आहे तर हे बैंकेच्या निर्णयावर अवलंबून आहे कि ते आपल्याला आपले पैसे परत करतील किंवा नाही. जर तसे पुरावे दिले तर आपल्याला आपले पैसे परत मिळू शकतात. त्यासाठी सगळ्यात पहिले काम हे करावे कि आपण बैंकेला या बद्दल सूचित करावे आणि सविस्तर माहिती द्यावी.