money

मोदींनी मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव केला, 4 हजाराची मूर्ती 13 लाख मध्ये खरेदी झाली, जाणून घ्या काय करणार पैश्याचे

नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेट वस्तूंचा हल्लीच लिलाव करण्यात आला आणि लिलावा मध्ये 1800 वस्तू विक्री केल्या गेल्या. या वस्तूंच्या लिलावाचे आयोजन नैशनल गैलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) मध्ये केले गेले तसेच ऑनलाईन देखील यावस्तूंचा लिलाव केला गेला. या लिलावा मध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला आणि या लिलावामध्ये ठेवलेल्या वस्तूच्या बेस प्राईसच्या 200 पटीने जास्त किमतीमध्ये त्या खरेदी देखील केल्या आहेत.

मागील महिन्यात झाला होता हा लिलाव 

या लिलावास जानेवारी महिन्याच्या शेवटी सुरु केले गेले होते आणि या माध्यमातून त्या सगळ्या वस्तूंचा लिलाव केला गेला ज्या पंतप्रधान मोदी यांना भेट स्वरूपात मिळाल्या. या लिलावा मध्ये कपड्यांपासून ते अनेक मूर्तींचा लिलाव केला गेला. आता लिलाव पूर्ण झाल्या नंतर पंतप्रधान कार्यालय ने माहिती दिली आहे कि लिलावा मध्ये कोणकोणत्या वस्तू किती रुपयांना खरेदी केल्या गेल्या. परंतु या लिलावा मधून किती पैसे प्राप्त केले गेले आहेत याची माहिती अजून मिळालेली नाही.

कितीला विकल्या गेल्या वस्तू 

पीएमओ द्वारे माहिती मध्ये सांगितले गेले आहे कि वस्तूंचा लिलाव त्यांच्या बेस प्राईज पेक्षा भरपूर जास्त किमती मध्ये झाला आहे. या लिलावामध्ये ठेवलेली भगवान शंकराची एक मूर्ती 10 लाख रुपयांना खरेदी केली गेली पण तिची बेस प्राईज केवळ पाच हजार रुपये मात्र ठेवले गेले होते. म्हणजेच ही मूर्ती बेस प्राईज पेक्षा 200 पटीने जास्त रुपयांना खरेदी केली गेली.

तर लिलावामध्ये ठेवलेल्या एका अशोक स्तंभ चे आधार मूल्य 4 हजार रुपये होते ज्यास 13 लाख रुपयांना खरेदी केले गेले. याच प्रमाणे भगवान गौतम बुद्ध यांची एक मूर्ती सात लाख रुपयांना खरेदी केली गेली जिचे आधार मूल्य 4 हजार रुपये ठेवले गेले होते. तसेच एक लाकडी बाइक 5 लाख रुपयांना खरेदी केले गेले.

कुठे खर्च होणार पैसे 

लिलावा मधून जमा केलेल्या पैश्यांचा वापर नमामि गंगे परियोजनेत केला जाईल. हि योजना मोदी सरकार द्वारे सुरु केली गेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत गंगा नदी सफाईचे कार्य केले जात आहे आणि आता लिलावातून मिळालेल्या पैश्यांचा वापर गंगेच्या स्वच्छतेसाठी वापरला जाणार आहे.

पहिले पण झालेला असा लिलाव 

मोदी यांनी पहिले देखील अश्याच मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव केला होता जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मिळालेल्या पैश्यांचा वापर बालिका शिक्षा अभियानासाठी केला होता. तर पीएम झाल्या नंतर लोकांकडून मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव केला आहे आणि भरपूर मोठ्या किमती मध्ये लोकांनी त्या वस्तू खरेदी केल्या आहेत.


Show More

Related Articles

Back to top button