love

‘क्रश’ला आपल्या समोर पाहून मुलींकडून नेहमी होतात ‘या’ चूका

जीवनामध्ये प्रत्येक नाते आपल्या अपेक्षेप्रमाणे खुलते असे नसते. काही मुली आपल्या आवडणाऱ्या मुलाच्या सोबत उघडपणे बोलतात तर काही बोलत नाहीत. अशी काही नाती त्यांच्या जीवनात फक्त एक ‘क्रश’ म्हणूनच राहतात.

मुली रिलेशनशिप मध्ये पुढाकार घेऊन बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या समोर त्यांना आवडत असलेला मुलगा आला की नकळतपणे त्या काही चुका करतात. त्याकोणत्या ते आज आपण पाहू.

त्याच्याकडे एकटक पाहत राहणं

मुली त्यांना आवडणारा पण त्याच्याकडे मनातल्या भावना बोलून दाखवू न शकणार्‍या मुलाला समोर पाहिल्यानंतर त्या सहाजिकच त्याला पाहूनच मन भरून घेतात. पण त्याने तुमच्याकडे पाहिल्यास तुम्ही कुठेतरी दुसरीकडेच पाहता. तो मुलगा तुमच्या आसपास असला तरीही त्या आपोआपच गालातल्या गालात हसतात.

अति उत्साही होतात

प्रामुख्याने कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये तुम्हांला आवडणारी व्यक्ती समोर दिसली नाही तर मुली अस्वस्थ्य होतात. तसंच त्याला समोर पाहिल्यानंतर, त्याने स्माईल केल्यानंतर मुली उत्साहाच्या भरात असं काही वागतात की त्यांच्याबद्दलचं इम्प्रेशन खराब होण्यास त्याच कारणीभूत ठरतात.

सोशल मीडियावरील अकाऊंट्स तपासणं

जेव्हा तुमच्या आवडणार्‍या व्यक्तीसोबत बोलणं शक्य नसतं, त्याच्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी शेअर करणं शक्य नसतं अशावेळेस मुली त्याची सोशल मीडियावरील अकाऊंट्स स्टॉक करणं (तपासणं) सुरू करतात. फेसबूक, इंस्टाग्राम,ट्विटरच्या मदतीने ते त्यांच्या आयुष्यातील लहान मोठ्यागोष्टींवर लक्ष ठेवतात.

मुली नर्व्हस होतात

मुली ‘क्रश’ला समोर पाहून किंवा अचानक तो तुमच्याशी बोलायला आला की नर्व्हस होतात. यामुळे अचानक त्या मुलासमोर त्यांचा आत्मविश्वास डगमगायला लागतो.

त्या नजरेला नजर द्यायला घाबरतात

अनेकदा मुली ‘क्रश’ला समोर पाहून तो प्रसंग आवडत असला तरीही त्यपासून पळून जातात. नजरेला नजर न देता त्या अधिक घाबरतात.उलट नजरेला नजर द्या म्हणजे तुमच्यामधील आत्मविश्वास पाहून ते अधिक इम्प्रेस होऊ शकतात.

दिवा स्वप्न पाहणं

अनेकदा मुली आवडत्या मुलाला समोर पाहून त्या क्षणांची मज्जा लुटण्यापेक्षा स्वप्नात अधिक रमतात. यामुळे त्या वेगळ्याच दुनियेत अधिक रमतात.


Show More

Related Articles

Back to top button