दूध सांडण्याचे असतात बरेचसे अशुभ संकेत, जाणून घ्या काय सांगते ज्योतिषशास्त्र

दूध हे एक अपारदर्शी पांढरा द्रव पदार्थ आहे जे मादीच्या दुग्ध ग्रंथी द्वारे बनवले जाते. नवजात बालक तेव्हा पर्यंत दुधावर अवलंबून असते जो पर्यंत ते इतर पदार्थाचे सेवन करत नाही. साधारणतः दुधा मध्ये 85 टक्के पाणी असते आणि उर्वरित भाग खनिज आणि चरबी असते. बाजारामध्ये अनेक ब्रँडचे पैकेज्ड दूध उपलब्ध आहे. दूध प्रोटीन, कैल्शियम आणि व्हिटामिन बी – 2 युक्त असते. तसेच यामध्ये व्हिटामिन ए, डी, के आणि इ सह फॉस्फोरस, मैग्निशियम, आयोडीन आणि अनेक खनिज आणि चरबी तसेच ऊर्जा असते.

परंतु आज आपण येथे दुधाचे फायदे काय यावर चर्चा करणार नसून दूध उकळून भांड्याच्या खाली सांडण्याचा ज्योतिषशास्त्रीय आणि पौराणिक अर्थ काय आहे हे जाणून घेणार आहोत.

याचे चार अर्थ असतात

ज्योतिषशास्त्र आणि पौराणिक माहिती तज्ञ लोकांच्या नुसार दूध उकळताना भांड्याच्या बाहेर सांडले तर याचा सरळ प्रभाव धन, नशीब, मान सन्मान यावर होतो. दूध सांडण्याचा संकेत हा आहे कि घरामध्ये लवकरच धन, मान, सन्मान, जमीन इत्यादीची मोठी हानी होणार आहे.

दूध सांडले तर घरामध्ये वादविवाद, कौटुंबिक वाद, संबंधामध्ये दुरावा निर्माण होतो.

उकळताना दूध सांडले तर याचा अर्थ शास्त्रानुसार असा होतो कि काही काळातच घरावर एक मोठी समस्या किंवा संकट येऊ शकते आणि लवकरात लवकर त्यासाठी आपण सावध राहिले पाहिजे.

दूध सांडणे याचा अर्थ घरामध्ये धनाच्या संबंधित मोठ्या समस्या सगळ्या समोर येणे. घरातील मोठ्या व्यक्तीचे काम किंवा व्यवसाय संकटात असू शकतो.