दिवाळीला भेसळयुक्त दूषित खवा किंवा मावा बाजारातून आणण्या पेक्षा घरीच बनवा शुद्ध खवा किंवा मावा या पद्धतीने

0
25

दिवाळीला बाजारामध्ये खवा आणि मावा यांना मागणी जास्त असते त्यामुळे भेसळखोर व्यापारी आणि उत्पादक भेसळ करून बाजारात खवा आणि मावा विक्री केल्याच्या अनेक घटना यापूर्वीच प्रत्येक दिवाळीला होत असल्याचे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपल्याला चांगला आणि कोणतीही भेसळ नसलेला खवा किंवा मावा घरी बनवता आला तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले राहील. कारण बाजारात मिळणार खवा अनेक दिवसा पूर्वी बनवलेला असतो आणि त्यास एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जातांना उंदीर आणि इतर किटाणू त्यांना दूषित करत असल्याच्या बातम्या काही वर्षा पूर्वी न्यूज चैनल ने दाखवल्या होत्या. त्यामुळे घरी खवा बनवून त्याचा आपल्या आवडीच्या मिठाई मध्ये वापर करणे उत्तम राहील.

खवा किंवा मावा बनवणे अगदी सोप्पे आहे यासाठी कोणत्याही विशेष स्किलची गरज नाही. अगदी कोणीही व्यक्ती यास घरच्या घरी बनवू शकतो. फक्त यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल पण जर आपल्याला उत्तम, कोणतीही भेसळ नसलेला आणि विश्वासार्ह खवा किंवा मावा पाहिजे असेल तर त्यासाठी आपण हा वेळ काढू शकतो. चला तर मंग जाणून घेऊ कसा घरच्याघरी खवा किंवा मावा बनवता येईल.

खवा किंवा मावा बनवण्याच्या अगोदर आपल्या पैकी काही लोकांना खवा आणि मावा या मध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेऊ. तर खवा आणि मावा या दोन्ही वस्तू आपल्याला माहीत आहेच कि दुधा पासून बनलेल्या असतात. पण आपल्या माहितीसाठी मावा हा गोड असतो म्हणजे यास बनवताना यामध्ये साखर मिक्स केली जाते तर मावा हा गोड नसतो यामध्ये साखर किंवा अन्य कोणतीही वस्तू मिक्स केलेली नसते. तर आता आपण जाणून घेऊ या दोन्ही वस्तू बनवण्याच्या पद्धती.

जवळपास 200 ग्राम खवा बनवण्यासाठी आपल्याला 1 लिटर दुधाची आवश्यकता आहे. हे दूध एका भांड्या मध्ये गरम करण्यास ठेवावे. दुधाला उकळी आल्या नंतर गैस मेडीयम करावा आणि चमचा किंवा पळीने दूध भांड्याच्या बुडाला जळणार नाही किंवा चिटकणार नाही यासाठी ढवळत राहावे. प्रत्येक 2-3 मिनिटांनी तुम्ही चमच्याने दूध खालून आणि आजूबाजूने ढवळावे.

दूध आपल्याला मेडीयम आचेवर उकळत ठेवायचे आहे. जसजसे दूध आटायला लागेल त्यामध्ये घट्टपणा वाढेल त्यामुळे भांड्याला खाली जळण्याची शक्यता वाढते त्यामुळे आपण दूध घट्ट होण्यास सुरुवात झाल्यावर चमचा सतत हलवत राहावा आणि दूध भांड्याला खाली जळणार नाही याची काळजी घ्यावी.

जर आपल्याला मावा बनवायचा असेल तर आपल्या चवी प्रमाणे यामध्ये साखर मिक्स करावी. अन्यथा दुधाचा खवा होई पर्यंत चमचा ढवळत राहायचे आहे. दुधातील सगळे पाणी आटून दूध पोळीच्या मळलेल्या पिठा प्रमाणे घट्ट झाले कि गैस बंद करावा. लक्षात ठेवा खवा आपल्याला लालसर होऊ द्यायचे नाही आहे त्या अगोदरच गैस बंद करावा. खवा थंड झाल्यावर तो अजून जास्त घट्ट होतो. त्यामुळे ही बाब देखील लक्षात ठेवावी.

आपल्याला 1 लिटर दुधाचा खवा बनवण्यासाठी 30 ते 40 मिनिट लागू शकतात. पण उत्तम आणि कोणतीही भेसळ नसलेला विश्वासार्ह खवा मिळवण्यासाठी आपण एवढा वेळ देऊच शकता. त्यामुळे जर आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर लाईक करण्यास विसरू नका.