astrology

बुध ग्रहाने केले सिंह राशी प्रवेश, या 8 राशीवर राहील शुभ प्रभाव, जीवनात मिळेल यश

ज्योतिषशास्त्रा नुसार एकूण 12 राशी आहेत आणि या सर्व राशीचे आपआपले वेगळे महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीची आपली एक वेगळी राशी असते त्यामुळे त्यांचा स्वभाव देखील वेगळा असतो. ग्रह-नक्षत्रामध्ये होणाऱ्या बदलाचा या राशींवर परिणाम होत असतो. ग्रह-नक्षत्रांच्या या बदलाचा सगळ्या 12 राशीचा परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाने कर्क राशी मधून सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. ज्याचा परिणाम सर्व राशीवर थोड्या जास्त प्रमाणात पडणार आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे या बद्दल माहिती देत आहोत.

चला पाहू बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशीला मिळणार शुभफळ

मेष राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनामुळे अचानक धन लाभ होण्याचा योग बनत आहे. याराशीच्या लोकांना कौटुंबिक आनंद मिळणार आहे. या परिवर्तनामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. धनाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील जर तुम्ही गायीची सेवा केली तर त्याचा फायदा होईल.

वृषभ राशीच्या लोकांना बुध परिवर्तनाचा लाभ आर्थिक स्वरूपात होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्याच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने हे परिवर्तन चांगले राहील. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त होतील. तुमच्या आयुष्यात सुरु असलेल्या सर्व समस्या आता समाप्त होतील. जर तुम्ही घरातून कपाळावर केसराचा टिळा लावून निघाले तर ते तुमच्यासाठी शुभ राहील.

मिथुन राशीसाठी बुध परिवर्तन झाल्यामुळे वैवाहिक सुख मिळेल. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. व्यापार करत असाल तर व्यापारामध्ये फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. पिवळ्या रंगाच्या कवड्यां जाळून त्याची राख वाहत्या नदी मध्ये सोडल्यास उत्तम लाभ मिळेल.

कन्या राशीला बुध परिवर्तनामुळे सुख समृद्धी मध्ये वाढ होईल. आर्थिक प्राप्तीच्या मार्गात वाढ होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आरोग्य चागले राहील. आपल्या आयुष्यातील धनाच्या संबंधी असलेल्या सर्व समस्या दूर होतील आणि धना मध्ये वाढ होईल. तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यश मिळेल. शुभ फळ मिळवण्यासाठी 19 सप्टेंबर पर्यंत हिरव्या रंगाच्या वस्तूंचा वापर करणे टाळावे.

वृश्चिक राशीच्या लोकांचे आपल्या जीवनसाथी सोबतचे नाते बुध परिवर्तनामुळे अजून चांगले होईल. तुमच्या वडिलांची प्रगती होईल. तुमचे जीवन आनंदी राहील. जे लोक व्यापार करतात त्यांना फायदा मिळेल. अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. दुर्गा मातेची उपासना केल्याने अति उत्तम लाभ होईल.

धनु राशीच्या लोकांना नशिबाची पुरेपूर साथ मिळेल. जुन्या आरोग्य समस्या पासून सुटका मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धनाच्या संबंधी असलेल्या समस्या दूर होतील. तुम्ही हिरव्या रंगाच्या वस्तूना वापर करू नये तुमच्यावर बुधाची कृपा राहील.

कुंभ राशीच्या लोकांना बुधाच्या या परिवर्तनामुळे जीवनसाथीची सोबत आणि सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. धन कमावण्यात यश मिळेल. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. जर तुम्ही पाण्यात भिजवलेले हिरवे मुग मंदिरात दान केले तर त्याचा चांगला फायदा मिळेल.

मीन राशीच्या व्यक्तींना बुध परिवर्तनामुळे आपल्या बोलण्यातून दुसऱ्या लोकांना आपल्याकडे आकर्षित किंवा प्रभावित करण्यात यश मिळेल. आपल्या कार्य क्षेत्रात धैर्याने काम करा तुम्हाला फायदा आवश्य मिळेल. तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल.

बाकीच्या राशीसाठी कसा राहील काळ

कर्क राशीच्या लोकांना या बुध परिवर्तनामुळे आपल्या जीवना मध्ये अजून जास्त मेहनत करावी लागेल. या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यापार करत असाल तर व्यापारामध्ये जास्त मेहनत करावी लागेल. मानसिक तणाव राहील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही तुमच्या जवळ चांदीची एखादी वस्तू ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी चांगले राहील.

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध परिवर्तन झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक कष्ट देऊ शकतात. आपत्या कडून त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. आपण आपल्या कौटुंबिक समस्यांवर आपल्या समजदारीने उपाय शोधावा. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. आर्थिक समस्या होऊ शकतात. हिरव्या रंगाच्या वस्तूंचे मंदिरा मध्ये दान केल्यास त्याचा फायदा मिळेल.

तुला राशीच्या लोकांना बुध परिवर्तानामुळे धनाच्या संबंधित समस्या होऊ शकतात. आपल्या कार्यक्षेत्रात विचारपूर्वक निर्णय घ्या. वेळेचे महत्व जाणून घ्या आणि वेळेचा सदुपयोग करा. गळ्यात तांब्याची वस्तू धारण केल्यास चांगले राहील.

मकर राशीच्या लोकांना या बुध परिवर्तनामुळे आपल्या जीवना मध्ये जास्त मेहनत करावी लागू शकते त्यानंतरच फायदा होऊ शकतो. आपल्या मनामध्ये कोणत्याना कोणत्या गोष्टीची चिंता राहील. आरोग्य समस्या होऊ शकतात. मातीच्या भांड्यात पिठीसाखर टाकून त्यास झाकून एखाद्या निर्मनुष्य जागी ठेवल्यास तुमच्या समस्येत कमी येऊ शकते.


Show More

Related Articles

Back to top button