celebritiesPeopleviral

भाऊ मुख्यमंत्री आणि बहीण आज पण रस्त्याच्या किनारी विकते चहा, भावाचे नाव काय आहे माहीत आहे का

प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी असते ज्या वेळी त्याला आपल्या कुटुंबियांची जास्त आठवण येते. पण ही गोष्ट सर्व लोकांच्यावर लागू होत नाही, कारण एक तर त्यांनी त्यांचे मन दगडाचे केले असते किंवा त्यांनी एखादा निश्चय केलेला असतो किंवा त्यांनी संसारिक जीवनाचा त्याग करून साधु बनण्याचे ठरवलेले असते. अश्या लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य कोणत्या परस्थिती मध्ये आहेत त्यांच्यावर कोणती संकटे आहेत हे कधी माहीत करून घ्यायचे नसते किंवा माहीत असले तरी मदत करायची नसते कारण त्यांचे ध्येय एवढे मोठे असते की त्यामध्ये कुटुंबाला स्थान नसते.

आज आम्ही तुम्हाला ज्या व्यक्ती बद्दल सांगत आहोत ती व्यक्ती एका मोठ्या राज्याची मुख्यमंत्री आहे आणि तरी देखील त्याची बहीण रस्त्याच्या किनारी चहा विकून आपला उदरनिर्वाह करत आहे. आम्ही गोष्ट करत आहोत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बद्दल.

आज देखील संपूर्ण कुटुंब साधे जीवन जगते

तुमच्या माहीतीसाठी गेल्या 19 मार्चला योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. 19 मार्चला त्यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या दरम्यान अनेक लोक त्यांची तुलना पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादव सोबत करत आहेत. पण योगी असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी राजकारणात कधी परीवारवाद आणला नाही. जेथे एकीकडे पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादवचे पूर्ण कुटुंब वडील, पत्नी ते अगदी काका सर्व राजकारणात आहेत, तर सीएम योगी यांचे कुटंब आजही साधेपणाने जीवन जगत आहेत.

पूजेच्या सामग्री सोबत चालवते चहा चे दुकान

योगी आदित्यनाथ मूळचे उत्तराखंडचे राहणारे आहेत. आपल्या 7 भाऊ-बहिणी मध्ये त्यांचा 5 वा नंबर आहे. तुम्हाला आश्चर्य होईल की जेथे योगी मुख्यमंत्री झाले आहेत त्याचवेळी त्यांची एक बहीण उत्तराखंड मधील कोठार गावात चहाची छोटी दुकान चालवून आपले जीवन जगत आहे. बातमी नुसार योगींची बहीण शशी पयाल कोठार गावातील पार्वती मंदिरा जवळ पती पुरण सिंह सोबत राहते. मंदिरा जवळच त्यांचे पूजा सामग्रीचे दुकान आहे, सोबतच त्या दुकानात ते चहा पण विकतात.

मी मोठा होऊन करेल जनतेची सेवा

शशी सांगते की भाऊ योगी आदित्यनाथ सोबत त्यांची भेट 11 फेब्रुवारी 2017 रोजी झाली होती. शशीला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्या म्हणतात त्यांनी कधी विचार देखील केला नव्हता की त्यांचा भाऊ उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होईल. शशी सांगते सर्व भाऊ बहिणी मध्ये योगींचा स्वभाव सर्वात वेगळा होता. ते आपल्या वडिलांना म्हणत की जीवनात तुम्ही केलेच काय आहे? तुम्ही फक्त मुलांचे पालन केले आहे. मी मोठा होऊन जनतेची सेवा करेल. त्यावेळी आम्हाला वाटले लहान आहे, तर मस्करी करत असेल, पण आज त्याची ती गोष्ट खरी होत आहे.

दीक्षा घेतल्यावर अजय सिंह चे नाव पडले योगी आदित्यनाथ

शशी चे लहान भाऊ अजय सिंह बिष्ट जेव्हा 22 वर्षाचे होते तेव्हा ते घर सोडून गोरखपूर आले होते. दीक्षा घेतल्यावर त्यांचे नाव योगी आदित्यनाथ पडले. शशी यांनी गेल्या 23 वर्षा पासून योगींना राखी बांधली नाही आहे शेवटची राखी त्यांनी आपल्या भावाला तेव्हा बांधली होती जेव्हा ते योगी झाले नव्हते.


Show More

Related Articles

Back to top button