हे दिवाळीला केल्याने वाढायला लागेल आपली कमाई, आर्थिक समस्या पासून मिळेल सुटका

दिवाळीचा दिवस माता लक्ष्मीची पूजा अर्चना करण्यासाठी विशेष मानला जातो, या दिवशी लोक माता लक्ष्मीची पूजा अर्चना करून धन-धान्य यांची मनोकामना  करतात.तंत्र-मंत्र मानणारे लोक या दिवशी अनेक उपाय आणि तोडगे करतात, सिद्धी मिळवण्यासाठी हा दिवस खास मानला गेला  आहे.असे सांगितले जाते कि दिवाळीच्या दिवशी काही सोप्पे उपाय केले गेले तर अश्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या होतात, विशेषतः आर्थिक समस्या पासून सुटका मिळते.

आपण दिवाशीच्या दिवशी काही सोप्पे आणि साधे तोडगे करू शकतो. ज्यांना केल्याने आपल्या आर्थिक समस्या लवकरच.दूर होतील. हे उपाय केल्याने शीघ्र लाभ प्राप्त होऊ शकतो आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते.

चला जाणून घेऊ दिवाळीला कोणते उपाय केल्याने धन संबंधित समस्याच दूर होतील

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते कि त्याचे उत्पन्न वाढ व्हावी पण काही ना काही समस्या त्याला होत असतात. जर आपल्याला उत्पन्नात वाढ पाहिजे असेल तर आपण दिवाळीला अख्खी उडद, दही आणि शेंदूर घेऊन पिंपळाच्या मुळा जवळ ठेवा आणि तेथे एक दिवा नक्की प्रज्वलित करा. त्यामुळे उत्पन्न वाढी मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.

जर आपण कठीण मेहनत करून पैसे कमवत आहात पण शुल्लक कारणासाठी आपला फायफ़ळ खर्च होत आहे, इच्छा नसताना देखील पैसे विनाकारण वाया जात आहे तर वायफळ खर्च होण्या पासून वाचण्यासाठी आपण हातजोडी मध्ये शेंदूर लावून पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा, यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि विनाकारण खर्च कमी होतो.

जर आपल्याला वाटते कि आपली तिजोरी पैस्यांनी भरलेली राहावी तर आपण ऊसाचे मूळ लाल कपड्यात गुंडाळून त्यावर शेंदूर आणि लाल चंदन लावावे आणि त्यास आपल्या तिजोरी मध्ये ठेवावे.

जर आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची आहे आणि आपली आर्थिक प्रगती पाहिजे असेल तर आपण दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करताना गोमती चक्र पूजेच्या थाळी मध्ये ठेवून माता लक्ष्मीची पूजा करावी.

जसे कि आपल्याला माहीत आहे कि माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे, जर आपण दिवाळीच्या रात्री घुबडाचा फोटो तिजोरी वर लावला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते.

आर्थिक समस्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण पिंपळाच्या पानावर दिवा लावून पाण्यात प्रवाहित करावा.

धन-हानी पासून वाचण्यासाठी दिवाळीची पूजा केल्या नंतर काळे तीळ हातामध्ये घेऊन घरातील सगळ्या लोकांच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून फेकून द्यावीत.