astrologymoney

शुक्रवारी केलेला एक उपाय रातोरात भाग्य बदलू शकते, बनवू शकतो श्रीमंत

आजकाल पैश्यांचे महत्व किती आहे हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. आजकाल पैसेच सर्वकाही झाले आहे आणि सर्व लोक पैश्यांच्या मागे धावताना दिसतात. काही लोक तर पैश्यांसाठी एखादे वाईट काम करण्यासाठी देखील मागेपुढे पाहत नाहीत. असे बोलले जाते कि वाईट काम करून मिळवलेला पैसा हा नेहमी दुख देतो, तर चांगले काम करून मिळवलेले थोडे पैसे देखील व्यक्तीला मोठे सुख देऊ शकते. पैश्यांची गरज सर्वांनाच असते.

जो श्रीमंत असतो त्याला देखील पैश्यांची गरज असते कारण तो नेहमी श्रीमंत रहावा यासाठी. तर जे लोक गरिबी मध्ये आपले जीवन जगत असतात त्यांना तर सर्वात जास्त गरज असते. त्यांच्यासाठी पैसे त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्याचे एक साधन असते.

धन प्राप्तीसाठी आपल्या हिंदू धर्मात अनेक उपाय सांगितले आहेत. हिंदू धर्मात माता लक्ष्मी धनाची देवी मानली जाते. शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवारी केलेले काही उपायामुळे शुक्र ग्रह पण अनुकूल होण्यास मदत होते त्याच सोबत माता लक्ष्मीची कृपा देखील होते.

आज आम्ही तुम्हाला इलायचीचा असा एक उपाय सांगत आहोत जो तुमचे भाग्य रातोरात उजळवेल. या उपायाने धन-दौलती सोबतच तुमची मनोकामना पूर्ण होते. हा उपाय शुक्रवारी रात्री 12 वाजता करायचा आहे.

असा करावा हा उपाय

शुक्रवारी रात्री 12 वाजता सर्वात पहिले व्यवस्थित हात-पाय धुवून स्वच्छ तयार व्हा आणि पांढरे कपडे कपडे धारण करा.

यानंतर कमळाच्या आसनावर बसलेल्या माता लक्ष्मीच्या फोटोला घरातील शांत आणि स्वच्छ जागी प्रस्थापित करा.

आता फोटोच्या समोर तीन इलायची ठेवा आणि आपल्या इष्टदेवाचे ध्यान करा. यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे ध्यान करत असताना शुक्रदेवास आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

यानंतर शुक्र मंत्र “ऊं द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:”  चा 21 वेळा जप करा.

मंत्र जप केल्या नंतर तीन इलायची आपल्या डाव्या हाताच्या मुठी मध्ये ठेवा आणि सर्व ग्रहांचे ध्यान करताना जीवनातील समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

यानंतर मुठ उघडून त्यावर तीन वेळा फुंकर मारा. आता इलायची एखाद्या भांड्यात ठेवून घराच्या मुख्य दरवाजावर घेऊन जा.

आता ज्या भांड्यात इलायची ठेवली आहे त्यामध्ये कापूर टाकून त्यास जाळावे. जेव्हा इलायची पूर्ण जळेल तेव्हा तिला तुळशीच्या झाडाखाली टाकावे.

जर तुळशीचे रोपटे नसेल तर त्यास वाहत्या नदी मध्ये विसर्जित करावे. काही दिवसातच तुम्हाला या उपायाचा परिणाम दिसण्यास सुरुवात होईल.


Show More

Related Articles

Back to top button