dharmik

श्रावणी सोमवारी हे खास उपाय केल्याने उत्पन्न वाढते आणि निरोगी जीवन मिळते

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला आपले खास महत्व आहे. तसेच वेगवेगळ्या देवी-देवतांचे देखील महत्व आहे. देवी-देवतांची पूजा हिंदू धर्मात अस्था ठेवणारा प्रत्येक व्यक्ती करतो. असे बोलले जाते की देवी-देवतांची पूजा केल्याने व्यक्तीला सुखी जीवन आणि उत्तम भविष्य प्राप्त होते. देवी-देवतांच्या पूजेमुळे व्यक्तीला सकारात्मक उर्जा मिळते.

सगळ्यांना माहित आहे की आता पवित्र श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या भक्तीला अत्यंत जास्त महत्व आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात अनेक लोक आपल्या पद्धतीने मेहनत घेतात. काही लोक शंकराला जल अर्पण करतात तर काही इतर उपाय करतात. हिंदू धर्माच्या मान्यते अनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात अत्यंत मनोभावे भोलेनाथांची सेवा केली जाते.

सोमवार भगवान शंकराचा दिवस मानला जातो

श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे कारण ते एक महिना पृथ्वीवर निवास करतात. त्यामुळे भक्तांच्या प्रत्येक इच्छा ते त्वरित पूर्ण करतात. श्रावण महिन्यात काही उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. शिवपुराणानुसार सुख-समृद्धी आणि निरोगी राहण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत. हे उपाय तर दररोज केले जाऊ शकतात, पण सोमवारच्या दिवशी हे उपाय केल्याने जास्त फायदा होतो. कारण सोमवार भगवान शंकराचा दिवस मानला जातो.

श्रावण महिन्यात करा हे उपाय

श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी पारद शिवलिंगाची स्थापना करा आणि त्याची विधिवत पूजा करा.

यानंतर “ऐं ह्रीं श्रीं ऊं नम: शिवाय: श्रीं ह्रीं ऐं” मंत्र 108 वेळा जप करा. प्रत्येक वेळी मंत्र पूर्ण झाल्यानंतर पारद शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण करा. बेलपत्रावर क्रमशः ऐं, ह्वी, श्रीं लिहा.

शेवटचे 108 वे बेलपत्र शिवलिंगवर अर्पण केल्यानंतर ते काढून घ्या आणि त्यास आपल्या पूजेच्यास्थानी (देवघरात) ठेवा आणि दररोज त्याची पूजा करा. हा उपाय केल्याने तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाईल.

असे मानले जाते की हा उपाय केल्याने जीवनात धन प्राप्तीचे योग बनतात आणि व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होते.

श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी पाण्यात दुध मिक्स करा आणि त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून शिवलिंगावर अभिषेक करा. यानंतर शिवलिंगावर बेल पत्र अर्पण करावे.

शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी तांब्याच्या धातूचा वापर करू नये तर अन्य इतर धातूच्या भांड्याचा वापर करावा. भगवान शंकरास अभिषेक करताना ऊं जूं स:मंत्र जप करावा. यानंतर भगवान शंकरास रोग निवारण करण्यासाठी प्रार्थना करावी.


Tags
Show More

Related Articles

Back to top button