कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्याने माता लक्ष्मी होईल प्रसन्न, जीवनात येईल सुख-समृद्धी

हिंदू धर्मा मध्ये असे अनेक विशेष दिवस आहेत ज्या दिवशी देवी-देवतांची पूजा-अर्चना केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात. याच काही दिवसा पैकी एक आहे कार्तिक पौर्णिमा. यावर्षी 12 नोव्हेंबर 2019 रोजी कार्तिक पौर्णिमा आहे. हा पवित्र महिना देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

या महीन्यात एकत्र सगळ्या देवी-देवतांना प्रसन्न करता येऊ शकते. कार्तिक पौर्णिमा धनाची देवी माता लक्ष्मीला प्रिय आहे, जर आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चना केली तर यामुळे माता लवकर प्रसन्न होते.

आज या पोस्टच्या माध्यमातून आपण कार्तिक पौर्णिमेला करता येणारे काही उपाय जाणून घेऊ. जर आपण या उपायांना केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकरच प्रसन्न होईल आणि आपल्या जीवनात सुख-समृद्धी येऊ शकते. या उपायांना केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतील.

चला जाणून घेऊ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल

असे मानले जाते कि पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी पिंपळाच्या वृक्षावर निवास करते. जर व्यक्ती या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला पाणी आणि दूध मिश्रण करून अर्पित करतो तर यामुळे माता लक्ष्मी या व्यक्तीवर प्रसन्न होते.

  • जर आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या निर्धन व्यक्तीला तांदूळ दान केले तर यामुळे चंद्र ग्रहां कडून मिळणारे वाईट फळ दूर होतात. यामुळे आपल्या जीवनातील समस्यां दूर होऊन कामे मार्गी लागतात.
  • कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर आपण शिव मंदिरा मध्ये जाऊन तेथे शिवलिंगावर कच्चे दूध, मध आणि गंगाजल अर्पित केले तर यामुळे महादेव आपल्यावर कृपा करतात.
  • असे सांगितले जाते कि व्यक्ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण लावतो तर त्याच्या घरातील सगळ्या समस्यां दूर होतात.

  • कार्तिक पौर्णिमेला चंद्र उदय झाल्या नंतर खीर मध्ये खडीसाखर आणि गंगाजल मिक्स करून धनाची देवी माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पित करावे, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.
  • जर आपल्याला वाटते कि कुटुंबा मध्ये समृद्धीचे योग बनावे तर आपण घराच्या दरवाजात रांगोळी अवश्य काढावी. या उपायाने सगळे नवग्रह प्रसन्न होतात, ज्यामुळे आपल्यावरील ग्रहांचा वाईट प्रभाव दूर होतो आणि आपल्या जीवना मध्ये आनंद येतो.

व्यक्तीचे जीवन अत्यंत दुर्लभ मानले गेले आहे, व्यक्ती आपल्या संपूर्ण जीवनकाळात चांगल्या आणि वाईट परिस्थिती मधून जातो, जेव्हा व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो तेव्हा त्याला कोणत्याही गोष्टीची काळजी नसते पण जेव्हा व्यक्तीच्या जीवनात समस्या येतात तेव्हा या अवस्थेत तो कासावीस होतो आणि त्याला सगळ्या समस्ये मधून सुटका पाहिजे असते आणि त्यासाठी तो निरनिराळे मार्ग शोधतो. पण शास्त्रात असे काही विशेष दिवस आणि मुहूर्त सांगितले आहे ज्यांच्यावर जर व्यक्तीने काही विशेष उपाय केले तर तो आपल्या जीवनातील समस्या कमी करू शकतो. वर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करता येणारे काही उपायांची माहिती दिली आहे ज्यांना आपण केल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतील.