आता आपल्याला कार्डचा ‘पासवर्ड’ लक्षात ठेवण्याची गरज नाही.. ही नवी सुविधा वापरून करू शकता ‘पेमेंट’, जाणून घ्या कसे

आता आपल्यासाठी एक खुशखबर आहे कारण आता`एटीएम कार्ड चा वापर करताना पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता संपली आहे. कारण मास्टरकार्ड ने ऑनलाईन शॉपिंग च्या अनुभवाला सोपे करण्यासाठीसाठी नवीन ‘आयडेंटिटी चेक एक्सप्रेस’ लॉन्च केले आहे. त्यामुळे आता या नव्या सुविधेच्या मदतीमुळे ऑनलाइन शॉपिंग (Online shopping) चे पेमेंट चेहरा किंवा अंगठा दाखवून सुद्धा करता येणार आहे.

मास्टरकार्ड ने ऑनलाइन शॉपिंग मधील फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ग्राहकांना सुरक्षित पेमेंट (Safe payment) चा पर्याय दिलेला आहे. भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेल्या ‘ग्लोबल मास्टरकार्ड सायबर सिक्योरिटी समिट’ मध्ये या ‘आयडेंटिटी चेक एक्सप्रेस’ ला सादर केले गेले.

असे होणार काम :

आयडेंटिटी चेक एक्सप्रेसचा वापर करण्यासाठी कस्टमरला आपल्या बँकेशी संपर्क करावा लागणार आहे. त्यानंतर या प्रोग्राम साठी कस्टमरला नोंदणी करावी लागणार आहे.

त्यानंतर आयडेंटिटी चेक साठी एक अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही जेव्हा ऑलनाइन शॉपिंग साइटवर खरेदी कराल तेव्हा तुम्हाला पेमेंटसाठी आपला चेहरा किंवा बोट दाखवावे लागेल. म्हणजेच बायोमीट्रिक ऑथेंटिकेशन करावे लागेल त्यामुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही.

सायबर अँड इंटेलिजेंस सॉल्यूशन मास्टरकार्डचे प्रेसिडेंट अजय भल्ला यांना याबद्दल विचारले असता त्यांनी,”भारतीय ग्राहकाची वाढती क्रय शक्ती आणि आकांक्षांबरोबरच ई-कॉमर्स चा देखिल मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. आपल्या खास वैशिष्ट्यानुसार मास्टरकार्ड डिजिटल आर्थिक व्यवहारांची सुरक्षा वाढविण्यासाठी सातत्याने संशोधन करत असतो. आयडेंटिटी चेक एक्सप्रेस चा शुभारंभ खास ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी आहे. कोणत्याही संशय आणि फसवणुकीशिवाय आर्थिक देवाणघेवाण व्हावी तसेच चेकआउटची प्रक्रिया मजबूत आणि सोपी व्हावी याची खात्री मास्टरकार्ड देत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here