lovePeople

आपल्या गोत्रात लग्न न करण्या मागे लपली आहे 34 हजार वर्षा पूर्वीची सभ्यता

जगातील जवळजवळ सर्वच धर्म आणि समुदायात ही परंपरा आहे की ते कधीही आपल्या नातेवाईक आणि गोत्रा मध्ये लग्न करत नाहीत.

पण काय तुम्हाला माहीत आहे गोत्रा मध्ये लग्न न करण्यामागे लपली आहे 34 हजार वर्षाची जुनी परंपरा.

हल्लीच झालेल्या एका रिसर्च मध्ये ही गोष्ट समोर आली आहे की नातेवाईकांच्या सोबत लग्न न करण्याची परंपरा कोणत्याही मोडर्न सोसाईट द्वारे बनवलेली परंपरा नाही आहे तर या मागे अस्तित्व आहे 34 हजार जुन्या सभ्यतेचे.

खरेतर हल्लीच कैम्ब्रीज युनिवर्सिटी आणि कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या विज्ञानिकानी एक रिसर्च केला त्यामध्ये समजले की 34000 वर्ष पहिले Prehistoric Humans ने आपल्या नातेवाईकाच्या सोबत कधी Inbreeding किंवा प्रजनन नाही केले.

यामागे त्यांचे मानणे होते की याचे घातक परिणाम समोर येऊ शकतात.

पण याच्या विरुध्द 50 हजार वर्ष पहिले Neanderthals आपआपसात संबंध बनवायचे आणि त्यांना कधीही Inbreeding करण्यात संकोच नव्हता. या रिसर्च मध्ये हा पण खुलासा झाला की Neanderthals च्या लवकर विलुप्त होण्याचे एक कारण Inbreeding पण होऊ शकते. या वैज्ञानिकांनी रुस च्या Upper Palaeolithic Site मध्ये दफन केले गेलेल्या चार लोकांचा डीएनए मैच करून पाहिला तर त्यांचा डीएनए आपसात मिळत नव्हता. याचा सरळ अर्थ आहे की हे लोक Inbreeding मुळे होणाऱ्या घातक परिणाम जाणून होते.

तर प्रोफेसर मार्टिन सिकोरा चे म्हणणे आहे की आता या रिसर्च वर फार सावधगिरीने काम केले गेले पाहिजे, त्यांनी हे पण सांगितले की त्यांना हे नाही माहीत की Neanderthal Inbred का करत होते. याचे एक कारण त्यांचे Isolated असणे पण असू शकते किंवा या समुदायात महिलांची कमतरते मुळे इंब्रिडीग त्यांची मजबुरी होती.

या रिसर्च वर अजून काम सुरु आहे आणि याबाबतीत अनेक महत्वाचे तथ्य समोर येणे बाकी आहे. पण या रिसर्चच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की आपल्या गोत्रात लग्न न करणे आणि शारीरिक संबंध न करणे यामागे आजकालची सभ्यता नाही तर हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे.


Show More

Related Articles

Back to top button