Marathi Jokes : एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो…

एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो.

मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो.

शेजारून चाललेला एक माणूस विचारतो – हे काय?

दारुड्या – कॅसेटची दुसरी बाजू लावलीय…


पोलीस (दारुड्याला) – रात्री एक वाजता कुठे चालला आहेस…?

दारुड्या – मी दारूचे दुष्परिणाम या विषयावर व्याख्यान ऐकायला चाललोय…!

पोलीस – इतक्या रात्री तुला कोण भाषण देणार आहे…?

दारुड्या – माझी बायको…!


एक बेवडा गच्चीतून खाली पडला

आजुबाजुचे धावत आले आणि बोलले “काय रे काय झाले”?

बेवडा – काय माहीत नाय बुवा,

मी पण आत्ताच खाली आलोय…


तीन दारुडे मित्र पुणे स्टेशनवर लोणावळा लोकलची वाट बघत उभे होते.

एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते.

तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो.

तो जोर जोरात हसू लागतो.

आजुबाजुचे लोक हैराण?

ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय?

न राहवून काहीजण त्याला विचारतात काय झालं हसायला?.

त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु?

ते दोघे जण मला सोडायला आले होते…

Web Title: very funny whatsapp marathi jokes Darudya Jokes in Marathi

Follow us on

Sharing Is Caring: