Marathi Jokes : अग, शेजाऱ्याकडून मलम आण ना…!

Marathi Jokes : हसणे आपल्यासाठी चांगले असते हे सर्वानाच माहीत आहे यामुळे मनावरील ताण कमी होतो. याचसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मराठी जोक्स जे तुम्हाला हसवतील.

कार्डिओलॉजिस्ट – तुमचे तीन ब्लॉक आहेत.

पेशंट – तीन नाही, चार आहेत…
एक कोथरूडला, दुसरा लोणावळ्याला,
तिसरा तळेगावला आणि चौथा चिंचवडला…

कार्डिओलॉजिस्ट – त्यातला एक विकायला काढा…
परवा बायपास आहे तुमची…


पत्नी – तुम्ही फारच भोळे आहात…!
तुम्हाला कोणीही सहज वेड्यात काढेल.

पती – सुरुवात तर तुझ्या बापाने केली…!


काकांचा पाय मुरगळला.

काका – (काकुना), अग, शेजाऱ्याकडून मलम आण ना…!

काकू – नाही, म्हणतायत ते…

काका – वा रे वा…! यांना काही शेजारधर्म आहे कि नाही?

काकू – जाऊ द्या, मी आपल्याकडच मलम काढते…!

Marathi Jokes : Trending Jokes in Marathi new viral marathi jokes whatsapp forwarded jokes

Follow us on

Sharing Is Caring: