दोन जिवलग मैत्रिणी
गप्पा मारत होत्या…..
पहिली: अग तुला सांगू , काल भलतीच गडबड होता होता वाचली
दुसरी: का ग काय झालं ?
पहिली: अग मी देवळात गेले होते.
दुसरी: बरं मग
पहिली: मी देवापाशी मागणार होते कि यांचे सगळे त्रास कष्ट काढून घे म्हणून..
दुसरी: मग त्यात काय
पहिली: पटकन लक्षात आलं आणि थांबले
म्हटलं देव मलाच उचलायचा..
गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात चपाती बुडवून खात होते…
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही…
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला ‘एक्स’
मानल आहे..!
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले.”व्हाय आर यू लेट?”
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.”
सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”
हजरजबाबी मन्याने म्हटले,”सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट….
Marathi Jokes : Viral jokes in marathi whatsapp forward marathi jokes