लग्नाच्या 18 वर्षानंतर…
बायको – माला पिझ्झा खायचा आहे.
नवरा पिझ्झा आणून देतो.
बायको – थँक्स.
नवरा – फक्त थँक्स?
बायको लाजून – इश्श, मग काय आता i love you वगैरे म्हणू का?
नवरा – फालतूपणा करू नकोस! अर्धा – अर्धा कर! नाय तर एका बुक्कीत दात पाडीन..
हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे?
तुमचे उत्तर इथे महत्त्वाचे नसते तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके
तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका..
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,
बायको: काय आहे?
नवरा: या २ वायरांपैकी एक धर जरा..
बायको: हं धरली,
नवरा: काही जाणवलं का?
बायको: नाही,
नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे….सोड आता..
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश…
नवरा: 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रूपये आणि चल निघ…
Marathi Jokes : Viral Husband and Wife Marathi Jokes whatsapp trending jokes in marathi