पेशंट: डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.
डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.
डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.
पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?
डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.
एक आजोबा डॉक्टरकडे जातात.
त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.
डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.
आजोबा: डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?
डॉक्टर: हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.
आजोबा: अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची.
मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे…वा, वा, वा !!!
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
रुग्ण: तेच तर केले होते.
Marathi Jokes : Viral doctor jokes in marathi language very funny marathi jokes