मुलगा: तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.
मुलगी: ओह्ह…काय नाव तुझ्या बायकोचं?
मुलगा: माझं अजुन लग्न नाही झालेलं.
तात्पर्य: नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका..
मुलगा: कुठे आहेस ??
मुलगी: mom dad सोबत डिनर करत आहे हॉटेल मधे,घरी पोहोचल्यावर बोलते.
तु कुठं आहे ?
मुलगा: तु ज्या भंडार्यात जेवत आहेस ना,
तिथं तुझ्या मागच्या पंगतीत, मी भात वाढत आहे… भात लागला तर सांग.
बॉयफ्रेंड: हाय डार्लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड: अरे पुण्याला आलीये.. फिनिक्स मॉल मध्ये
एक ब्लू जिन्स पाहिली आहे २००० ची, घेते आता मस्त आहे,
तू कुठे आहेस?
बॉयफ्रेंड: मी इथं इस्लामपुरात गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे,
आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर,
त्याला माझे नाव सांग… मित्र आहे तो आपला…
Marathi Jokes : Viral Boyfriend and Girlfriend Marathi Jokes Navin Marathi Vinod